हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 323

हिंदी राजकारणाचा विचका २८१

“लाहोरचे एक. गृहस्थ आपल्या पत्रात म्हणतात. बारडोली निर्णयाबाबत आजपर्यंत प्रकाशात आलेल्या हकीकतीवरून असे दिसून येते की, एकतर हा निर्णय पंडित मालवीय यांचे वजनामुळे अगर अनत्याराच्या अवास्तव कल्पनांमुळे घेण्यात आलेला असावा. पहिल्या बाबतीत ही गोष्ट मालवीयजीस न शोभणारी दिसते तर दुसऱ्या बाबतीत जाणतेपणाचा अभाव दिसून येतो. काँग्रेसचे ध्येय अहिंसा नसून स्वराज्य आहे, हे खरे नाही काय ?"'

“पत्र लेखकाविषयी सहानुभूती न वाटणे अशक्य आहे. दिल्लीमध्ये दिसून आलेल्या मनोवृत्तीचे त्यांचे पत्र हे एक प्रतीक आहे. पंडित मालवीयांचा बार्डोली निर्णयाशी काहीच संबंध नाही. हे मी पूर्वीच जाहीर केले आहे. तसेच

'अहिंसेच्या अवास्तव कल्पनां' चाही या निर्णयाशी काही संबंध नाही. पत्रलेखकाचे

पत्र हेच याचा उत्कृष्ट पुरावा आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे तर्कशुद्ध दृष्टीने विचार केल्यास मर्यादित अनत्याराच्या राष्ट्रीय शपथेतच बार्डोली निर्णयाचा उगम आहे,

असे दिसून येईल.

राष्ट्राचे ध्येय स्वराज्य आहे, अहिंसा नव्हे या मताला माझी पूर्ण संमती आहे. माझ्याबाबतीतही अहिंसा हे माझे ध्येय आहे परंतु त्याबरोबर स्वराज्य हे देखील माझे ध्येय आहे, हेही तितकेच खरे आहे. कारण अहिंसा मार्गाचा अवलंब केल्याशिवाय जनतेला स्वराज्य प्राप्ती होणे अशक्य आहे. परंतु हिंदुस्थान देश पारतंत्र्याच्या बेडीत खितपत राहण्यापेक्षा अत्याचाराच्या मागनिही स्वराज्य मिळवणे मला पत्करेल, असे मी वारंवार मत दिले नाही काय ? ”

२९ मे सन १९२४ च्या 'यंग इंडिया' च्या अंकात त्यांनी जो हिंदू-मुसलमानांच्या 'दंग्या' वरती लेख लिहिला त्यातही या विषयासंबंधाने खालीलप्रमाणे विचार व्यक्त

केले आहेत.

“What | see around me to-day is, therefore, a reaction against the creed of non-violence. lfeelthe wave of violence coming. The Hindu- Muslim tension is on acute of this trend.

| have never presented to India that extreme form of non-violence, it only because | do not find myself fit enough to re-deliver that ancient message. Though my intellect has fully understood and grasped it, it has not as yet become part of my whole being. My strength lies in my asking people to do nothing that | have not tried repeatedly in my own life. 1am often asking my country-men today to adopt non-violence as their creed, only for the purpose of regulating the relations between the different races, and for the purpose of attaining Swaraj. Hindus and Musaimans, Christians, Sikhs and Parsis must not settle their differences by resort to violence and the means for the attainment of Swaraj must be non-violence.