२८२ डॉ. बाबासाहेब आँबेडकर लेखन आणि भाषणे
| do not say ‘ eschew violence in your dealing with robbers or thieves or with nations that may invade India.’ But in order that we are better able to do so, we must learn to restrain ourselves. Itis a sign of strength but of weakness to take up the pistol on the slightest pretext. Mutual fisticuffs are a training notin violence but in emaseution. My method of non-violence can never lead to loss of strenght, but it alone will make it
possible, if the nation wills it, to offer disciplined and concerted violence in time of danger.”
“ama मला अहिंसावादाच्या प्रसाराची प्रतिक्रिया माझ्या सभोवार दिसत आहे. अत्याचाराची लाट उसळणार, असे मला वाटू लागले आहे. हिंदू-मुसलमानांची तेढ हे याच प्रतिक्रियेचे आत्यंतिक लक्षण आहे. [. ]
अहिसेचा हा पुरातन संदेश फिरून पुकारण्यास मी स्वतःला लायक समजत नसल्यामुळे मी हिंदुस्थानापुढे अनत्याचाराचे आत्यंतिक स्वरूप कधीच मांडले नाही. अहिंसेचे तत्त्व माझ्या बुद्धीला जरी पूर्णपणें उमगले असले-माझ्या बुद्धीला जरी त्याचे पूर्णपणे आकलन झाले असले- तरी ते माझ्या अंगी बाणलेले नाही. जी गोष्ट मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात फिरफिरून अनुभवून घेतलेली नाही, ती गोष्ट करण्यास मी लोकांना सांगत नाही व यातच माझे नैतिक बल साठलेले आहे. म्हणून केवळ जातिजातीतील परस्पर संबंधाची घडी नीटपणे बसविण्यासाठी व स्वराज्य संपादनासाठी अहिसेचे ब्रीद स्वीकारा, असे मी माझ्या देशबांधवांना सांगत आहे. माझे म्हणणे असे की, हिंदू, मुसलमान, खिश्चन, शीख व पारशी यांनी आपसातील कलह मिटविण्यासाठी अत्याचाराचा अवलंब करता कामा नये. त्याचप्रमाणे स्वराज्य संपादनाचा मार्गदेखील अनत्याचाराचा असला
पाहिजे.
“ चोर, दरवडेखोर अगर हिंदुस्थान देशावर स्वारी करणाऱ्या राष्ट्राचा समाचार घेताना 'अत्याचार टाळा, अहिंसा पाळा ' असे मी मुळीच म्हणत नाही ; परंतु अनत्याचारी व्रत धारण करण्यास समर्थ होण्यासाठी आपण संयम राखण्यास शिकले पाहिजे. क्षुल्लक कारणासाठी पिस्तुलाला हात घालणे हे ताकदीचे लक्षण नसून कमकुवतपणाचे लक्षण आहे. आपापसातील हातघाईने अत्याचाराचे शिक्षण न मिळता उलट नामर्दपणाच निर्माण होतो. माझ्या अनत्याचारी पद्धतीने बलहीनता येणे कदापि wey नसून, उलट तीमुळेच वेळ पडल्यास संकटसमयी राष्ट्राची इच्छा असल्यास पद्धतशीर शिस्तीने संघटितपणे अत्याचारी मार्गाचा अवलंब करणे शक्य होईल. “