हिंदी राजकारणाचा विचका २८३
वरील लेखातून प्रतिपादिलेले त्यांचे जुने मत व आज त्यांनी मांडलेले मत या
दोहोत किती महदंतर पडले आहे, हे कोणास सांगावयास नको. हे अंतर का पडले या प्रश्नाचे उत्तर अत्यंत उद्बोधक ठरेल, यात शंका नाही. आमच्या मते गांधींच्या विचारांमध्ये अशातज्हेचे परिवर्तन होण्यास जी-कारणे असू शकतील त्यापैकी महत्वाचे कारण त्यांना 'हिंदुस्थानचा पुढारी ' ही स्थिती कमी प्रतीची वाटून ' जगाचा उद्धारक ' म्हणून जगावयाचे, अशी अहंभावना उत्पन्न झाली आहे, असे आम्हांस तरी वाटते. गांधी यांना प्रसिद्धीची व मोठेपणाची किती हाव आहे, हे त्यांच्या भक्तगणातील पुष्कळ लोकांना कबूल नसले तरी ती सर्वाच्या माहितीतील गोष्ट आहे. निःशस्त्र-प्रतिकाराची एक '' अमोल चीज "' '' अमृतवल्ली आपणं शोधून काढली आहे असे त्यांना वाटते. हे तत्त्व हिंदुस्थानच्या उद्धाराकरिताच काय परंतु जगाच्या उद्धाराकरिता उपयोगात आणता येईल, अशी त्यांची महत्वाकांक्षा आहे. हिंदुस्थान देशावर त्याचा प्रयोग करून दाखवून जगाला त्याची सिद्धता दर्शवून द्यावी, अशी त्यांची मनीषा आहे. कारण तसे झाले तर साहाजिकपणे जगातील अद्वितीय पुरुष म्हणून , आपणास कीर्ति संपादन करता येईल अशी त्यांची वासना आहे.
'' हिंदुस्थानचः पुढारी की जगाचा उद्धारकर्ता ? "
यांच्या झगड्यात जगाचा उद्धारकर्ता होण्याची तृष्णा बलवत्तर झाली असल्यामुळे गांधींचे अहिंसेच्या बाबतीत मतांतर झाले आहे, असे आम्हास वाटते.
याचा पुरावा ता. २३ फेब्रुवारी १९२२ च्या ' यंग इंडिया ' च्या अंकात “No end _ to my sorrow” “ माझ्या खेदाला सीमा उरली नाही. “ या लेखात सापडू शकतो. बार्डोलीचा कायदेभंगाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला याबद्दल गांधींची मिस्टर पॉल रिचर्ड नावाच्या गृहस्थाबरोबर चर्चा झाली होती. त्यात
गांधी म्हणाले की,
“Ido not work for freedom of India, I work for non-violence in the world and that is the difference between me and Mr. Tilak. Mr. Tilak was telling me, ' I would sacrifice even truth for freedom of my country 'butI am ready to sacrifice even freedom for the sake of truth. "
'“ माझे कार्य हिंदुस्थान देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे नसून जगात अहिंसा तत्त्वाची प्राणप्रतिष्ठा करणे हे आहे. हा मी आणि टिळक यांच्यातला भेद आहे. टिळक मला म्हणत 'माझ्या देशाच्या स्वातंत्र्याकरिता मी सत्याचादेखील बळी देईल. ' परंतु मी म्हणतो की सत्याकरिता देशाच्या स्वातंत्र्याचा बळी
देण्यास देखील माझी तयारी आहे. ''