हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 326

२८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

या मुलाखतीचा स्फोट मि. रिचर्ड यांनी त्यावेळच्या " लोकमान्य “ वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी केला व म्हणाले की, गांधींची तहान हिंदुस्थानच्या पुढारीपणाने भागणार नसून त्यांना जगातला महात्मा होण्याची इच्छा झाली आहे. हे खरे का, म्हणून लोकमान्याच्या संपादकाने गांधींना विचारले. त्यास उत्तर देण्याकरिता गांधींना वरील लेख लिहावा लागला. त्यात गांधींना मोठ्याच कष्टाने म्हणावे लागले की, “मि. रिचर्ड यांनी माझ्या तोंडी जे शब्द घातले आहेत त्यात अंतर्भूत असलेले सत्य मला नाकबूल करता यावयाचे नाही. ' {tis not possible to

deny the substance of it.)

गांधींनी या देशाचे धिंडवडे काढण्याचे जे अनेक उपक्रम केले त्यापैकीच आत्यंतिक अहिंसेचा हा एक उपक्रम आहे. मदांध होऊन आपल्या बायकांचे धिंडवडे काढणारे नवरे सर्वत्र सापडतात. पण देशाचे धिंडवडे काढणारा पुढारी मात्र हिंदुस्थानाबाहेर अन्यत्र कोठे पाहावयास सापडणार नाही. हा सगळा मदांधपणाचा परिणाम आहे. मद दारू प्याल्यानेच येतो, दुसऱ्या कशानेच येत नाही, असे मात्र म्हणता येणार नाही, महात्मा होण्याची पिपासा दारू इतकीच मद आणते हे गांधींनी सिद्ध करून दिले आहे.

युद्धात साहाय्य करणारांचे तीन पंथ

हिन्दुस्थान व इंग्रज लोक यांचा संबंध इतंका अन्योन्य आहे की युद्ध सुरू झाल्याबरोबर इंग्रजांना या युद्धात मदत करावी किंवा नाही हा प्रश्‍न या देशातील लोकांसमोर उभा राहणे अगदी अपरिहार्य होते. परंतु या महत्वाच्या प्रश्‍नासंबंधाने आतापर्यंत या देशामध्ये एकमत झालेले नाही, हे सर्वांना माहीत आहे. लढाई सुरू झाल्यापासून गेल्या जून महिन्यापर्यंत या देशात साहाय्य करावे किंवा न करावे या प्रश्‍नासंबंधाने दोन पंथ होते.

पहिला पंथ म्हणजे या युद्धात ब्रिटीश लोकांना बिनशर्त मदत करावी, असे . म्हणणारा पक्ष होता. त्यात स्वतंत्र मजूर पक्ष व नेमस्तांचा पक्ष या दोन पक्षांची गणना केली पाहिजे. स्वतंत्र मजूर पक्षातफे आम्ही (डॉ. आंबेडकर यांनी) तारीख १३ सप्टेंबर सन १९३९ रोजी एक जाहीर पत्रक काढून असा खुलासा केला होता की, इंग्रज सरकारच्या हातून हिंदुस्थानच्या हिताच्या बाबतीत पुष्कळ हेळसांड झालेली आहे, व देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तर मोठी आबाळ झालेली आहे. तथापि, या देशाला ब्रिटिशांशी जे भांडण भांडावयाचे असेल त्याची शहानिशा युद्ध संपल्यावर करून घ्यावी. परंतु युद्धामध्ये साहाय्य करण्यास यावेळी तरी अटीतटीचा वापर या देशातील लोकांनी करू नये. अशाच