२८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आश्वासन काँग्रेसने सर्व प्रकारच्या अल्पसंख्यांकांना आश्वासन मागण्यापूर्वीच,
संरक्षणाच्या अटी ज्यात घातलेल्या नाहीत अशा दिले आहे की अल्पसंख्यांकांच्या
हिन्दू बहुजन काँग्रेस मान्य करणार नाही, शिवाय प्रकारची राज्यघटना स्वतः
आहे. उलट मुस्लिम लीगच्या समाजाचा जो कल आहे तो काँग्रेसच्या भूमिकेकडे
अटींना हिंदूंचा विरोधच आहे. कारण या अटी ब्रिटीश सरकारविरुद्ध नसून हिंदूंविरुद्धच आहेत म्हणून फक्त काँग्रेसच्याच भूमिकेचा विचार करणे पुरेसे आहे व प्रासंगिक आहे. काँग्रेसच्या सर्वच अटींचा विचार करण्याचे कारण उरलेले नाही. कारण ज्या अटी काँग्रेसने पहिल्याप्रथम मांडल्या होत्या त्यातील पुष्कळशा अटी काँग्रेसने मुकाट्याने गिळल्या आहेत, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. देशातील लोकांनी निवडून दिलेल्या निर्णायक मंडळाने राज्यघटना तयार करावी ही अट हिंदुस्थानातील काँग्रेसवाल्याशिवाय अन्य कोणत्याही पक्षास मान्य झालेली नाही. या योजनेवर सर्व बाजूंनी जो प्रहार करण्यात आला त्यामुळे गांगरून जाऊन या प्रश्नाची काँग्रेसने पुन्हा वाच्यता केल्याचे दिसत नाही व ती अट काँग्रेसने बहुतेक सोडून दिल्यासारखीच आहे. स्वातंत्र्याच्या बाबतीत जवळ जवळ तोच प्रकार झाला आहे, असे
म्हणावयास काही हरकत नाही.
नुकतेच काँग्रेसचे डेप्युटी महात्मा श्री. राजगोपालाचारी यांनी जे भाषण केले आहे त्यांत “हिंदुस्थान देश आजपासून स्वतंत्र आहे, अशी मागणी आजच काही आम्ही ब्रिटिशांकडे केलेली नाही. आम्ही जे मागत आहो ते इतकेच की हिंदुस्थान देशाला पुढे मागे केव्हातरी तसे वाटल्यास स्वतंत्र होण्याचा हक्क आहे, एवढेच इंग्रजांनी मान्य करावे. याच्यापलिकडे काँग्रेस आज काही मागत
नाही. “ असा त्यांनी खुलासा केला आहे.
वाघीन व्याल्यावर जशी आपली पिल्ले आपणच खाते त्याप्रमाणे काँग्रेसने आपल्या अटी आपणच गिळंकृत केल्या. तरीपण हिंदू बहुजन समाज इंग्रजांना बिनशर्त मदत करावी असे म्हणावयास तयार नाही, हे SAS आहे. ही जी हिंदू समाजाची भावना झाली आहे तिच्याबद्दल कोणालाही आश्चर्य करण्यासारखे काही
नाही. ब्रिटीश साम्राज्याचे जे अनेक भाग आज ज्याप्रमाणे इंग्रजांच्या साहाय्यास धावून येत आहेत त्याप्रमाणे या देशातील लोक धावून जातील अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. ' कळवळ्याची याति आणि लाभावीन प्रीती ' अशी जी तुकारामाची उक्ती आहे ती अगदी यथार्थ आहे. हिंदुस्थानातील लोक व ब्रिटीश लोक यांच्यात एकमेकांबद्दल कळवळा वाटण्याला काही कारण नाही. त्यांचा
रक्तामासाचा काहीच संबंध नाही. जितजेत्याचे नाते असल्यामुळे उभयतांमध्ये सलोखा नाही. अशा परिस्थितीत परकीय आणि दुखवलेल्या भावनांमुळे
हिंदुस्थानातील लोकांना इंग्रजांना मदत करण्याची इच्छा झाली नाही तर त्यात
काही नवल नाही.