हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 329

हिंदी राजकारणाचा विचका २८७

अशाप्रकारची भावना उत्पन्न होण्यास एक गोष्ट विशेषतः कारणीभूत झाली आहे, असे आम्हास वाटते. इंग्रजांचे राज्य म्हणजे साम्राज्य आहे, या साम्राज्याच्या विस्तारावर पुष्कळ लोकांचा कटाक्ष आहे. एकंदर पृथ्वीच्या खुष्कीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ५ कोटी ५५ लक्ष स्क्वेअर मैल आहे. त्यापैकी

१ कोटी ४० लक्ष स्क्वेअर मैल इतके क्षेत्र इंग्रजांच्या ताब्यात आहे, ८२ लक्ष ५० हजार स्क्वेअर मैल इतके सोव्हिएट रशियाच्या ताब्यात आहे ; ४३ लक्ष ३०हजार फ्रेंचांच्या ताब्यात आहे ; ४२ लक्ष ५० हजार चीनच्या ताब्यात आहे आणि ३७ लक्ष ५० हजार अमेरिकेच्या ताब्यात आहे. बाकीच्या राहिलेल्या देशांचे क्षेत्रफळ अगदी लहान आहे, हे आकडे पाहिले म्हणजे पुष्कळांना हेवा वाटतो. त्वेषही वाटतो. ५।' कोटी क्षेत्रफळापैकी इंग्रजांच्या ताब्यात जवळ जवळ १।। कोटी प्रांत आहे, हे पाहून कोणासही आश्‍चर्य व हेवा वाटणे साहजिक आहे. तसेच या इंग्रजांच्या साम्राज्याकरिता आपण लढणे म्हणजे हे साम्राज्य कायम करण्यास मदत करणे, असे हिंदू लोकांस वाटल्यास त्यातही WS आश्चर्य नाही. हा समाज पं. जवाहरलाल नेहरू यांच्या साम्राज्यविरोधी भाषणांनी अगदी दृढ झालेला आहे.

हिंदू लोकांचा हा समज अगदी चुकीचा आहे व त्यामुळे त्यांच्याहातून होत असलेली कृती त्यांना अंती घातक होणार आहे, असे आम्हास निःसंशय वाटते. म्हणून त्यांनी खालील प्रश्‍नांचा विचार करावा ; व मग आपले मत काय असेल ते ठरवावे, अशी आम्ही त्यांना सूचना करू इच्छितो. कॅनडा हा देश ब्रिटीश साम्राज्याचा भाग आहे, पण आज केनडा ब्रिटीश लोकांच्या अंमलाखाली आहे असे कोणाला म्हणता येईल काय ? साऊथ आफ्रिका हा देश ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग आहे पण तो ब्रिटिश अंमलाखाली आहे, असे कोणाला म्हणता येईल काय ? आस्ट्रेलिया हा देश ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग आहे, पण आस्ट्रेलियावर ब्रिटिशांचा अंमल आहे असे म्हणता येईल काय ? आयर्लंड हा देश ब्रिटिश साम्राज्याचा भाग आहे, पण तो ब्रिंटिशांच्या अंमलाखाली [आहे, ] [असे ] कोणाला म्हणता येईल'काय ? हेच प्रश्‍न निराळ्या पद्धतीने मांडावयाचे [झाले ] तर, विचारता येईल की कॅनडा हा जरी ब्रिटिश [साम्राज्याचा ] [भाग ] [असला ] [तरी ] सवलतीच्या दृष्टीने अशी कोणती गोष्ट आहे की [जी ] [गोष्ट ] [इंग्रजांना ] [कॅनडा ] [देऊ ] शकतो ती गोष्ट जर्मनांना देऊ शकत नाही ? [जी ] [गोष्ट ] [आस्ट्रेलिया ] [ब्रिटिशांना ] देऊ शकतो ती.जर्मनांना देऊ शकत [नाही ] [? ] [साऊथ ] [आफ्रिका ] [ब्रिटिशांना ] [देऊ ] शकते ती जर्मनांना देऊ शकत नाही? आयर्लंड ब्रिटिशांना देऊ शकते [ते ] [जर्मनांना ] देऊ शकत नाही ? आणखी एका [दृष्टीने ] [पाहिले ] [तर ] [हा ] [प्रश्‍न ] [तिसऱ्या ] [त-हेने ]