हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 330

२८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मांडता येईल. अशी कोणती गोष्ट आहे की जी कॅनडा करू इच्छितो पण इंग्लंड त्याला ती करू देणार नाही , जी गोष्ट आस्ट्रेलिया करू इच्छिते पण इंग्लंड त्याला हरकत घेऊ शकतो ; साऊथ आफ्रिका करू म्हणते पण इंग्रज त्याला आडकाठी करू शकतील ? या दृष्टीने विचार केला असताना असे दिसून येईल की इंग्रजांच्या राज्य पद्धतीस साम्राज्यशाही असे नाव देणे म्हणजे गैरसमज करून घेण्यासारखे आहे. साम्राज्यशाही म्हणजे एक प्रकारची सरदेशमुखीच आहे आणि जेथे सरदेशमुखी कायमचे स्थान करून राहील त्यालाच साम्राज्यशाही म्हणता येईल. इंग्रजांच्या साम्राज्यशाहीत सरदेशमुखीला कायमचे स्थान नाही. अन्य सर्वत्र ठिकाणी ज्याप्रमाणे साम्राज्यशाही अस्त्वात आली त्याचप्रमाणे इंग्रजांच्या साम्राज्यशाहीचा SHS सरदेशमुखापासूनच झाला. परंतु कालांतराने त्यांच्या साम्राज्यशाहीतून सरदेशमुखीचे उच्चाटन होऊ शकते. इंग्रजांच्या अंमलाखाली असलेले देश सरदेशमुखीपासून स्वतंत्र होऊ शकतात, ही गोष्ट इंग्रजांचा इतिहास सिद्ध करू शकतो.

कॅनडा, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, आयर्लंड वगैरे देश इंग्रजांच्या सरदेशमुखीखाली चालत होते. आज तेच देश कोणत्याही प्रकारचा रक्तपात किंवा यादवी केल्याखेरीज या इंग्रज सरदेशमुखीपासून स्वतंत्र झालेले आहेत व इंग्रजांचा त्यांच्यावर कोणत्याही तऱ्हेचा ताबा राहिलेला नाही. यादृष्टीने पाहिले असताना ब्रिटिशांच्या साम्राज्याचा जो एवढा मोठा विस्तार दाखविला जातो त्यात काही अर्थ नाही. कारण कोणत्याही दृष्टीने जरी पाहिले तरी कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयलंड वगैरे देश हे ब्रिटिश साम्राज्याच्या क्षेत्राच्या बाहेरचे आहेत, असे म्हणावयास काही हरकत नाही. यांनां जर साम्राज्यातून वगळले तर ब्रिटिश साम्राज्य आज जे मोठे भव्य दिसते ते फारच चिमुकले आहे, असे दिसून येईल.

यावर कोणी असे म्हणतील की हे खरे असले तरी त्याचा आम्हाला काय उपयोग ? बाकीचे साम्राज्यातील देश ब्रिटिशांच्या सरदेशमुखीपासून मुक्त ' झाले असले तरी हिंदुस्थान अजून त्यांच्याच सरदेशमुखीखाली खितपत पडलेला . आहे आणि जर मुक्तता होत नाही तर आम्ही इंग्रजांना मदत कां करावी? या प्रश्‍नाला दोन उत्तरे देता येतील.

पहिले उत्तर असे की हिंदुस्थान देश ब्रिटिशांच्या सरदेशमुखीपासून मुक्त होण्याच्या मार्गाला लागलेला आहे. इतकेच नव्हे तर त्याने पुष्कळसा पल्ला गाठलेला आहे. आज ना उद्या कॅनडा-आस्ट्रेलियाचा दर्जा या देशाला प्राप्त झाल्याशिवाय राहू शकत नाही. या गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत की त्या आंधळ्याला देखील दिसू शकतील. असे असताना साम्राज्यशाहीला चिकटून