हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 331

हिंदी राजकारणाचा विचका २८९

हिंदू लोकांनी या युद्धात मदत करण्याचे नाकारावे, हे मोठे अनुचित आहे. आजच्या आज तो दर्जा ब्रिटिश लोक हिंदुस्थानला देत नाहीत म्हणून त्यावर आग पाखडण्यात काही अर्थ नाही. कॅनडा-आस्ट्रेलिया यांचा दर्जा हिंदुस्थानास प्राप्त होण्यास विलंब होत असेल तर त्याचा सर्वच आरोप ब्रिटिशांवर लादता येईल, असे आम्हास वाटत नाही. हिंदुस्थानातील लोकांच्या आपापसातील भांडणामुळेच हा उशीर होत आहे, हे विसरून चालणार नाही. सर्वांचे एकमत झाले तर हा दर्जा प्राप्त होण्यास काडीचाही विलंब लागणार नाही. ब्रिटिशांकडून तरी हरकत होणे शक्‍य नाही. कारण त्यांनी अनेक वेळा जाहीर केले आहे की ब्रिटिश साम्राज्यात जो कॅनडाचा दर्जा आहे तोच हिंदुस्थानचा दर्जा. हिंदुस्थानच्या या विरोधाला दुसरे उत्तर असे की. या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला व हिंदुस्थानवर हिटलरचे राज्य झाले तर हिंदुस्थानातील लोकांना पुन्हा राजकारणास श्रीगणेशापासून सुरवात करावी लागेल. म्हणजे आतापर्यंत झालेल्यावर पाणी सोडून ' नवी विटी नवे राज्य ' अशी सुरवात करावी लागेल. पण ही आशा फारच मोठी आहे, असे म्हणता येईल. हिटलरने हिंदुस्थानातील लोकांना पुन्हा श्रीगणेशापासून सुरवात करण्यास जर सवलत दिली तर या देशातील लोकांचे ते मोठेच भाग्य समजले पाहिजे. काळ्या रंगाच्या लोकांसंबंधी हिटलरच्या मनाचा कल काय आहे, हे समजून घेणे अवश्य आहे. त्याची पूर्ण कल्पना यावी म्हणून त्याच्या ' माईन कांफ ' या पुस्तकातून पुढील वाक्ये देत आहोत :

“It is a crime against the eternal Creator to train the dark races for intellectual careers. They should be trained like poodles. The earliest human civilization has rendered possible not so much _as the training of animals as by the employment of men of inferior race rega: It is in accordance with the Eternal will which rules Universe to advance the victory the better and thé stronger and command the subordination of the weaker and the worse. ”

“ बुद्धिजीवी आयुष्यक्रम आखण्याचे काळ्या लोकांना शिक्षण देणे म्हणजे सनातन अशा जगज्जनक परमेश्वराचा गुन्हा करणे होय. काळ्या लोकांना कुत्र्याप्रमाणेच शिक्षण दिले पाहिजे. सनातन मानवी संस्कृती अस्तित्वात येऊ शकली ती जनावरांना शिकविल्याने नव्हे तर हलक्या जातीच्या लोकांना कामाला जुंपून ह्या विश्वावर सत्ता गाजविणाऱ्या पुराण पुरुषांच्या इच्छेला अनुसरून उच्च

आणि बलिष्ठ जातींनी नीच आणि बलहिन अशी जातींवर आपली ताबेदारी लादून

आपल्या विजयश्रीच्या मार्गावर पुढे सरकले पाहिजे, “