हिंदी राजकारणाचा विचका २९५
मी त्यांना इतकेच सुचवू शकतो की जीवन हे अनेकविध अंगोपांगांनी बनलेले आहे आणि या जीवनामध्ये सत्य आणि अहिंसा या तत्त्वासंबंधी असे काही गूढ प्रश्न उपस्थित होतात की त्यांचे पृथःकरण करणे आणि त्यावर मत देणे म्हणजे अनेक वेळा बुद्धीला ते एक आव्हानच असते. दीर्घ प्रयत्न आणि मूक प्रार्थना यांच्या योगाने मनुष्याला सत्य प्रतीत होते आणि त्या सत्याची समाजात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी फक्त न्याय्य अशा साधनांचा जो एकच मार्ग आहे तो-म्हणजेच सत्याग्रहाचा किंवा आत्मशक्तीचा-मार्ग त्याला दिसू लागतो. मी माझ्या मित्रांना इतकेच आश्वासन देऊ शकतो की सत्यसंशोधन करण्याच्या कामी मी काडीइतकोही कसूर करत नाही आणि सत्यान्वेषणाच्या कंटाळवाण्या पण रमणीय अशा मार्गाचे आक्रमण करणाऱ्या पांथस्थाप्रमाणे, विनम्र पण सतत प्रयत्न आणि मूक प्रार्थना हे दोन विश्वासू सहचर मला सदैव लाभलेले असतात. "
वरील उताऱ्यातील विचारसरणी केवळ तात्त्विकदृष्ट्या प्रतिपक्षाला उत्तर देण्याच्या हेतूने जर गांधींनी उपयोगात आणली असेल तर त्याबद्दल आम्हाला काही म्हणावयाचे नाही. परंतु ही विचारसरणी जर प्रामाणिकपणाची असेल तर गांधींना असा सवाल करणे भाग पडते की हिंसावादी मुसलमान खिलाफतवाद्यास मदत करण्यास अहिंसावादी गांधींना कोणत्याही प्रकारची नेतिक अडचण जर आड येऊ शकली नाही तर इंग्रजास या युद्धात मदत करण्याकरिता गांधींच्या आड अहिंसा का यावी ? खिलाफतवाद्यांचे ध्येय न्याय्य होते म्हणून त्यांना मदत करण्यास अहिंसावादी गांधी यांना काही अडचण नव्हती तर या युद्धात इंग्रजांची बाजू अन्याय्य आहे असे गांधींना म्हणावयाचे आहे [काय ] [? ] [या ] [प्रश्नाला ] [गांधी ] काय उत्तर देऊ शकतात हे पाहाण्यास पुष्कळ लोक [मोठ्या ] [कौतुकाने ] [वाट ] [पाहात ] बसतील यात काही आश्चर्य नाही. परंतु आम्हाला तरी या प्रश्नाचे गांधी काही उत्तर देऊ शकतील, असे वाटत नाही. वाटेल त्यावेळी वाटेल ते बोलावयाचे व साधेल त्याप्रकारे बाजू मारून न्यावयाची [याची ] [गांधींना ] [खोडच ] [लागलेली ] दिसते. आतापर्यंत कोणत्याही बाबतीत एक मत देऊन [गांधी ] [स्थिरावले ] [आहेत, ] असे आम्हाला तरी आढळून आलेले नाही. सन १९१४ सालच्या महायुद्धात टिळकांनी "इंग्रजांची नड ही हिन्दुस्थानची [सवड,” ] ["साम्राज्याच्या ] [गरजा ] [येती ] आमच्या काजा” या व्यावहारिक [म्हणीप्रमाणे ] [हिन्दुस्थान ] [देशाने ] [युद्धात ] [बिनशर्त ] मदत करू नये, या मताचा प्रचार [सर्व ] [देशभर ] [केला ] [होता. ] त्यावेळी गांधोंनी टिळकांना विरोध केला व [इंग्रजांना ] [बिनशर्त ] [मदत ] [करावी ] [या ] [मताचा ] [पुरस्कार ]