हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 339

हिंदी राजकारणाचा विचका २९७

जाणार आहेत. हिंदुस्थानच्या भविष्यकालासंबंधी जो निर्णय लागावयाचा आहे तो दिल्ली किंवा व्हाईटहॉल येथे लागणार नसून फ्रान्सच्या रणभूमीवर लागणार आहे. हे साधे सत्य ओळखण्यासाठी परमेश्वर आपणाला व स्वायत्ततावाद्यांना शहाणपण देवो. आपल्या स्वराज्याचा दिंडी दरवाजा फ्रान्सच्या भूमीवर आहे. रक्ताचे सडे पडल्याशिवाय खराखुरा विजय आतापर्यंत कोणालाही प्राप्त झालेला नाही. दोस्तांच्या विजयासाठी लढणारी स्वातंत्र्यवाद्यांची अजिक्य सेना जर आपण फ्रान्सच्या रणभूमीवर पाठवू शकलो तर त्यामुळे आपण आपल्याही हितासाठी लढू शकू असे केल्याने भविष्यकाढी- नव्हे तर ताबडतोब स्वायत्तता मिळवण्यासारखी आपण परिस्थिती निर्माण करू. म्हणून माझे देशाला असे सांगणे आहे की ब्रिटनच्या विजयासाठी मरणाचीही पर्वा न करता ब्रिटनसहित लढा उभारा, त्याबरोबरच आपणास योग्य त्या सुधारणा मिळविण्यासाठी चळवळ करा. नोकरशाहीच्या कट्टर विरोधावर सन्माननीय विजय मिळविण्याचा हाच

खात्रीलायक मार्ग आहे. असे झाल्याने शेवटी कसल्याही प्रकारचा हेवा-दावा मनात राहणार नाही. केवळ अडवणुकीच्या व विध्वंसक मार्गाने आपणाला ध्येयप्राप्ती होणे अशक्य नसेल, परंतु त्यामुळे आपल्या व ब्रिटिश लोकांमध्ये एकमेकांविषयी वैरभाव मात्र निर्माण होईल व तो भावी कालातील परस्पर भागीदारासाठी केव्हाही पोषक ठरणार नाही."

यावरून गांधी १९१४ सालच्या युद्धात ब्रिटिशांना मदत करण्याच्या मताचा किती जोराने प्रचार करीत होते, याची कल्पना वाचकांना येईल. त्यावेळी 'तुम्ही इंग्रजांना बिनशर्त मदत करण्यास का सांगता' असे त्यांना जिकडून तिकडून विचारण्यात येत असे. त्या प्रश्‍नाला गांधींनी जे उत्तर दिले आहे तेही आजच्या प्रसंगी ध्यानात ठेवण्यासारखे आहे. १९१५ सालच्या एप्रिल महिन्यात मद्रास येथे वकिलांचा वार्षिक जेवण समारंभ झाला. त्याप्रसंगी गांधी यांना आमंत्रण दिले होते. इतकेच नव्हे तर ब्रिटिश साम्राज्याला दीर्घायुष्य चितण्याबद्दल त्यांना भाषण करण्यास विनंती करण्यात आली होती. तो प्रसंग साधून बिनशर्त विरोध करणाऱ्या विरोधकांना खालीलप्रमाणे उत्तर दिले,

“During my three months tour in India as also in South Africa | have been so often questioned how |, a determined opponent of modern civilization and an avowed patriot could reconcile myself to loyalty of the British Empire of which India was such a large part, how it was possible for me to find it consistent that India and England could work together for mutual benefit. It gives me the greatest pleasure this evening at this great and important gathering to re-declare my loyalty to the British Empire and my loyalty is based upon very selfish grounds. Asa