२९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
passive resister, | discovered that a passive resister has to make good his claim to passive resistence, no matter under what circumstances he finds himself, and | discovered that the British Empire has certain ideals with which | have fallen in love and one of the ideals is that every subject of the British Empire has the best scope possible for his energies and nonour and whatever he thinks is due to his conscienee. | think that this is true of the British as it is not true of any other Government. (Applause) | feel, as you here perhaps know that | am no lover of any Government, and | have more than once said that, that Government, is the best which governs least. And {have found that itis possible for me to be governed least under the British Empire.” (Loud applause).
माझ्या हिंदुस्थानातील तीन महिन्यांच्या दौऱ्यात व त्याचप्रमाणे अफ्रिकेमध्ये मला बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारण्यात आले की मी आधुनिक सुधारणांचा कट्टा विरोधक आणि कट्टा स्वदेशाभिमानी असताना ब्रिटिश साम्राज्याशी राजनिष्ठ कसा राहू शकतो ? आणि हिंदुस्थान व इंग्लंड हे दोन्ही देश मिळून एकमेकांच्या बच्याकरिता झटतील हे मी कसे सांगू शकतो ? आजच्या या मोठ्या महत्त्वाच्या प्रसंगी मला पुन्हा एकदा ब्रिटिश राज्याशी माझी राजनिष्ठा जाहीर करावयास आनंद वाटतो. माझ्या या राजनिष्ठेच्या मुळांशी मोठा स्वार्थ आहे. मी स्वतः अनत्याचारी विरोधक असल्यामुळे मला असा अनुभव आलेला आहे की कोणत्याही बिकट परिस्थितीत अशा विरोधकाने असा विरोध करण्याची आपली लायकी सिद्ध करावयास पाहिजे. मला ब्रिटिश साम्राज्यात काही उत्कृष्ट गोष्टी आढळल्यामुळे मला त्याच्याबद्दल आस्था वाटावयास लागली. त्यातील एक उत्कृष्ट गोष्ट म्हणजे ब्रिटिश साम्राज्यात प्रत्येक व्यक्तीच्या उत्साहाला, प्रतिष्ठेला आणि सद्सद्विवेक बुद्धिला भरपूर वाव मिळतो. ही वस्तुस्थिती फक्त ब्रिटिश साम्राज्यातच आढळून येते, दुसऱ्या राजवटीत आढळत नाही. (टाळ्या) मला असे वाटते, आणि तुम्हाला पण त्याची जाणीव असेल की मी कोणत्याही सरकारचा भक्त नाही ; व मी किती तरी वेळा बोलूनही दाखविलेले आहे की जे सरकार कमीत कमी सत्ता चालविते तेच सरकार उत्तम म्हटले पाहिजे आणि मला असा संभव वाटतो की माझ्यावर ब्रिटिश साम्राज्यच कमीत कमी सत्ता चालवील, म्हणूनच ब्रिटिश सरकारशी मी एकनिष्ठ mÈ.” (मोठ्याने टाळ्या)
वरील मताप्रमाणे गांधी १९१४ सालच्या युद्धात वागले, याच्याबद्दल कोणांस काही सांगावयास नको. या युद्धात इंग्रजांना साहाय्य करावे किंवा न करावे या एकाच विषयासंबंधाने या गेल्या दहा महिन्यात त्यांनी तीन प्रकारची परस्पर विरोधी
मते प्रगट केल्याचे दिसून येते.