हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 341

२९९ हिंदी राजकारणाचा विचका

या प्रसंगी आम्हास लोकांना इतकेच सांगावयाचे आहे की गांधींचे खरे मत कोणते हे कळणे अत्यंत कठीण आहे, एखादा लहरी मनुष्य लहर लागली म्हणजे मागचा पुढचा विचार न करता मनास येईल तसे किंवा एखादा वेडा मनुष्य ज्यावेळी जे सुचेल तसे त्यावेळी बरळतो तशाच प्रकारचा गांधींच्या मताचा प्रकार आहे, असे आम्हास तरी मोठ्या खेदाने म्हणावे लागते. गतकाळातील त्यांची मतांतरे कसकशी होत गेली आहेत याचे कोणी जर संशोधन केले तर ते मोठे मनोरंजक होईल असे आम्हास वाटते. परंतु गतकाळातील एकाच विषयावरील त्यांचा झालेला मतपालट बाजूस ठेविला आणि हे युद्ध सुरु झाल्यापासून या युद्धात या देशातील लोकांनी आपले धोरण कोणत्या प्रकारचे ठेवावे एवढाच एक विषय जर घेतला तर या दहा महिन्यात या विषयासंबंधाने, त्यांना तीन प्रकारची परस्पर विरोधी मते प्रकट केल्याचे दिसून येते. लढाई सुरू झाल्याबरोबर दोन-तीनच दिवसांनी गांधी आणि व्हाईसरॉय ह्यांच्या सिमला येथे गाठभेटी झाल्या. गांधी यांच्या विरुद्ध त्यांच्याच काँग्रेसमधील अनुयायांची अशी तक्रार आहे की गांधी काँग्रेसचे पुढारी म्हणून, काँग्रेसच्या वतीने व्हाईसरॉय ह्यांना भेटावयास जातात, परंतु व्हाईसरॉय ह्यांच्याबरोबर काय बोलणे झाले, याचा पत्ता ते काँग्रेसवाल्यासही कधी लागू देत नाहीत. परंतु या प्रसंगी मात्र त्यांनी आपण होऊनच व्हाईसरॉयच्या मुलाखतीत काय घडले ह्याचे खुलासावजा एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्या पत्रकात त्यांनी खालील प्रमाणे आपले विचार प्रकट केले होते,

“Having made my position vis-a-vis Congress quite clear | told His Excellency that my own sympathies were with England and France

from the purely humanitarian standpoint, | told him that | could not contemplate, without being stirred to the very depth, the destruction of London, which had hitherto been regarded as impregnable. And as! was picturing before him the Houses of Parliament and Westminster Abbey and their possible destruction, | broke of down. | am in perpetual quarrel with God that He should allow such things to on. My non- violence seems almost impotent. But the answer comes at end of the daily quarrel that neither God nor non-violence is impotent. Impotence is in men. I must try on without loosing faith even though | may break in

the attempt.”

““काँग्रेसच्या संबंधात माझे स्थान कोणते हे अगदी स्पष्ट केल्यावर मी नामदार व्हाईसरॉयांना सांगीतले की इंग्लंड आणि फ्रान्स यांच्याविषयी मला स्वतःला जी सहानुभूती वाटते ती शुद्ध मानवी हिताच्या दृष्टीनेच वाटते. आतापर्यंत अभेद्य समजल्या जाणाऱ्या लंडन शहराचा नाश होणार हा विचार देखील मला सहन होत नाही. या विचाराने अन्तःकरण थरारून जाते, असेही मी व्हाईसरॉयांना म्हटले. हाऊस ऑफ पार्लमेंट व वेस्ट मिन्स्टर अँबे यांच्या संभाव्य नाशाचे चित्र