हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 342

300 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मी नामदारांच्या समोर रेखाटीत असतांना माझी कंबर खचली. माझे चित्त खिन्न झाले. मनातल्या मनात, परमेश्वराने अशा प्रकारच्या गोष्टी घडू द्याव्यात याबद्दल मी परमेश्वराबरोबर नित्य भांडत असतो. माझे अहिंसातत्व जवळ जवळ दुबळे झाले, असे मला भासू लागले आहे. पण प्रत्येक दिवशी भांडणाच्या अखेरीस मला उत्तर मिळते की ईश्‍वर दुबळा नाही आणि अहिंसाही दुबळी नाही. दुबळेपणा माणसाच्या ठिकाणी आहे. या प्रयत्नात माझा देश भंग पावला तरी हरकत नाही, पण श्रद्धा न गमावता मला प्रयोग करीत राहिलेच पाहिजे.''

५ | am not therefore just now thinking of India’s deliverance. It will come. But what will it be worth if England and France fall ?”

“सध्या मी हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा विचार करीत नाही. हिंदुस्थान स्वतंत्र होईलच. पण इंग्लंड आणि फ्रान्स पडल्यावर त्या स्वातंत्र्याला काय किंमत राहणार आहे ?" हे उद्गार गांधींचे आहेत. ता. ५ सप्टेंबर १९३९ ला व्हाईसरॉय बरोबर मुलाखात झाल्यानंतर गांधींनी वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीजवळ हे उद्‌गार

काढले.

ही त्यांची पहिल्याप्रथमची भूमिका होय. या उताव्यावरून स्पष्ट दिसून येईल की लढाईच्या सुरवातीस ब्रिटिश लोकांना या देशातील लोकांनी बिनशर्त मदत करावी असे त्यांचे मत होते. यानंतर १५-९-३९ रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीची ' वैठक वर्ध्यास भरली. त्या बैठकीत वर्किंग कमिटीने असा ठराव केला की “ ब्रिटिशांनी या युद्धात, लोकशाहीच्या तत्त्वासंबंधी, तसेच साम्राज्यशाहीच्या तत्त्वासंबंधी आपले ध्येय व त्या ध्येयाचा फायदा हिंदुस्थानातील लोकांना कितपत देण्यात येईल, ह्याचा स्पष्ट शब्दात व निःसंदिग्ध भाषेत खुलासा करावा व जोपर्यंत इंग्रज सरकार तशाप्रकारचा खुलासा करीत नाही तोपर्यंत या लढाईत इंग्रजांना काँग्रेसने मदत करणे शक्य नाही. “ काँग्रेस वर्किंग कमिटी आणि गांधी यांचा परस्परांचा गुरुशिष्यांचा संबंध आहे हे ज्यांना माहीत आहे त्यांना अशा प्रकारचा ठराव वर्किंग कमिटीने पास केला हे पाहून खरोखरीच आश्‍चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. ५ सप्टेंबरला इंग्रजांना या युद्धात बिनशर्त मदत करावी असे गांधी म्हणतात आणि त्याच महिन्याच्या १५ तारखेस गांधींच्या विद्यमाने भरलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सभेने 'इंग्रजांनी आपले ध्येय जाहीर केल्याशिवाय त्यांना मदत करता येणे शक्‍य नाही' असा ठराव पास करावा हा एक विचित्र प्रकार आहे, असेच म्हणावे लागेल. एक तर गांधींचे पहिले मत म्हणजे केवळ दांभिकपणा होता, किंवा वर्किंग कमिटीने त्यांना धाब्यावर बसविले, असे म्हटल्याखेरीज गत्यंतर नाही. परंतु ह्याच्यापेक्षा विशेष चमत्कारिक गोष्ट म्हटली म्हणजे वर्किंग