हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 345

हिंदी राजकारणाचा विचका ३०३

युद्धाच्या बाबतीत आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलीच आहे. अटीतटीचा करारमदार करीत बसण्यापेक्षा या देशातील लोकांनी लढाईत इंग्रजांना मदत करावी, असे आमचे मत आहे. ते मत अप्रामाणिक आहे, असे कोणास म्हणावयाचे असेल तर त्याने खुशाल म्हणावे. आम्ही उत्तरादाखल म्हणू शकू की जे आमचे मत आहे तशाचप्रकारचे मत १९१४ सालच्या युद्धात गांधींचे होते. फरक इतकाच की गांधींनी आपली भूमिका बदलली आहे. आम्ही आमची भूमिका बदलली नाही आणि तशी भूमिका बदलण्यास इंग्रजांकडून काही प्रमाद घडला आहे, असे आम्हास वाटत नाही.

आमची भूमिका स्पष्ट केलेली असल्याने इतरांच्या मतांतराच्या भानगडी उकरून काढण्याची आम्हास काही हौस नाही. परंतु कारण नसताना पुढारी गणला गेलेला माणूस आपल्या मताची उलटापालट करू लागतो तेव्हा अशा गोष्टी उकरून काढणे जरूर होते-नव्हे कर्तव्य होऊन बसते. मताच्या उलटापालटीत गांधींच्या अपराधाचा घडा भरावयाचा राहिलेला आहे, असे आम्हास वाटत नाही. वाटेल त्यावेळी वाटेल ते मत द्यावयाचे ही गांधोंना एक खोडच लागलेली आहे, असे दिसते. कोणाही माणसाला एकदा एक मत द्यावयास व दूसऱ्यांदा दुसरे मत द्यावयास मोठी शरम वाटते. पण गांधींनी याबाबतीत सारी लाजलज्जा सोडून दिल्यासारखे वाटते. नुकतेच कोणीतरी गांधींच्या वारंवार होणाऱ्या मतांतराबद्दल पृच्छा केली होती. पृच्छकाला गांधींनी जे उत्तर दिले ते मोठे वाचण्याजोगे मासलेवाईक आहे. ता. ३०-९-१९३९ च्या 'हरिजन' च्या अंकात

गांधी लिहितात [:- ]

“ Atthe time of writing! never think of what! have said before. Myaim is not to be consistent with my previous statements on a given question, but to be consistent with truth as it may present itself to me at a given moment. Theresulthas been that| have grown from truth to truth; | have saved my memory an undue strain; and what is more, whenever | have been obliged to compare my writing even of fifty years ago with the latest, | have discovered no inconsistency between the two. But friends who observed inconsistency will do well to take the meaning that my latest writing may yield unless, of course, they prefer the old. But before making the choice they should try to see if there is not an underlying and abiding consistency between the two abiding seeming inconsistencies.”

'“कोणत्याही विषयावर लिहिताना त्या विषयासंबंधी मी पूर्वी काय म्हटले होते याचा विचार मी केव्हाच करीत नाही. एखाद्या विशिष्ट प्रश्‍नासंबंधी मी पूर्वी केलेल्या विधानाशी आजची विधाने सुसंगत आहेत की नाहीत हे पाहणे हा माझा ` हेतू नसतो. विशिष्ट क्षणी जे सत्य मला प्रतीत होते त्या सत्याशी माझ्या त्या