क्रांतीची उपासना कां ध्येयाचे रक्षण - Page 348

८९

क्रांतीची उपासना कां [ध्येयाचे ] [रक्षण ]

'' पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमधील बहुतेक देशांना वाटू लागले की लोकशाहीप्रणीत राज्य देशाला व समाजाला हितावह नाही. रशियाने कम्युनिझमचे तत्वज्ञान स्वीकारले आणि हेच सर्व देशांना तारक होय असा प्रचार चालविला. इटलींत फॅसिझम सुरू होऊन त्या देशानेही तोच प्रचार चालविला. . जर्मनीत नाझीझम सुरू होऊन त्या देशानेहि तोच प्रचार चालविल्यामुळे युरोपात, लोकशाही, साम्यवाद व दंडूकेशाही (फॅसिझम व नाझीझम) असे तीन गट उत्पन्न झाले आणि ते परस्परांचे हाडवैरी झाले. दंडुकेशाही गट लोकशाही व साम्यदाद यांना नष्ट करण्याच्या घोषणा करूं लागला. हिटलर व मुसोलिनी यांनी लोकशाही गट नष्ट केला तर ते आपणालाही नष्ट करतील अशी स्टालिनला भिती वाटत होती; आणि त्या दोन दंडुकेबहाद्दरांनी स्टालीनचा साम्यवाद नष्ट केला तर ते आपणांलाही नंतर नष्ट करतील, अशी भीती लोकशाही राष्ट्रांना वाटत होती. या तीन गटांची स्पर्धा स्वशक्ती वाढविण्यासाठी सुरू झाली. इटलीने अबिसिनियावर स्वारी करून तो देश आपल्या वर्चस्वाखाली आणला. जर्मनीने पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया हे देश जिंकले व दुसऱ्या महायुद्धाला तोंड लागले. जर्मनी द इटली यांच्यावर इंग्लंड व फ्रान्स या देशांनी युद्ध पुकारले (३-९-१९३९) जर्मनी व रशिया यांचा मैत्रीचा करार झाला होता (ऑगस्ट १९३०). म्हणून रशिया युद्धांत पडला नाही. पण या कराराचा भंग जर्मनीने केला व रशियावर स्वारी केली तेव्हा रशियाने जर्मनी व इटली यांच्याबरोबर युद्ध पुकारले. हे दुसरे महायुद्ध साम्राज्यवादी राष्ट्रांचे आहे, म्हणून त्यांत भारत भाग घेणार नाही; असा भारतीय USGA पुकारा केला. सात प्रांतातील कॉँग्रेस मंत्रीमंडळांनी १९३९ च्या नोव्हेंबरमध्ये राजिनामे दिले. जोपर्यंत रशिया या युद्धांत पडला नाही, तोपर्यंत हिंदी कम्युनिस्ट पार्टी असा प्रचार करीत असे कीं हे रक्तपिपासू साम्राज्यवाद्यांचे युद्ध आहे, त्याला कामगारांनी मदत करू नये. स्वतंत्र मजूरपक्ष या युद्धाला सर्वानी मदत करावी, असा प्रचार करीत असे. काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टी यांची भूमिका कशी चुकीची आहे आणि स्वतंत्र मजूर पक्षाची भूमिका कशी बरोबर आणि परिणामी देशाला व पर्यायाने सर्व जगाला हिंतावह आहे याबद्दल साधक-बाधक माहिती देऊन बाबासाहेबांनी जनतेच्या ९-११-१९४० च्या अंकात (पा. ४-५) एक अग्रलेख लिहिला. " "

turer, परिशिष्ट क्रमांक : १६.

१ : खैरमोडे, खंड ९ वा, पृ. ४४-४५.