क्रांतीची उपासना कां ध्येयाचे रक्षण - Page 349

क्रांतीची उपासना कां ध्येयाचे रक्षण ३०७

दरवर्षी ता. ७ नोव्हेंबर हा दिवस रशियन राज्यक्रांतीचा दिवस म्हणून

जगांतील सर्व कामगार उत्साहाने साजरा करतात. हिंदुस्थानमध्ये रशियन

क्रांतीचे चहाते व उपासक जरी पुष्कळ नसले तरी बरेचसे आहेत असे म्हणावयास

कांही हरकत नाही व ते देखील हा दिवस हिंदुस्थानमध्ये मजूर लोकांनी साजरा

करावा अशा प्रकारचा प्रयत्न करीत असतात. त्याप्रमाणे थोड्या बहुत प्रमाणांत तो हिंदुस्थानमध्ये या वर्षी साजरा करण्यांत आलाच.

रशियामध्ये प्रस्थापित करण्यांत आलेल्या कम्युनिस्ट समाज पद्दतीसंबंधाने, कोणाचे कांही मत असो, परंतु रशियन क्रांतीचा दिवस मानवी समाजाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याबद्दल कोणाही सुजाण माणसाला शंका असेल, असे आम्हाला वाटत नाही. सुरूवातीपासून आतापर्यंत मानवी समाजाच्या जीवनक्रमाच्या इतिहासातींल टप्पे शोधून काढण्याचा कोणी जर प्रयत्न केला, तर फ्रेंच राज्यक्रांतीचा दिवस हा पहिला टप्पा आहे, हे कोणांसही कबूल करावे लागेल. मानवी समाजाच्या इतिहासांत समाजाची रचना प्रथम समता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर झाली पाहिजे अशी घोषणा जर पहिल्या कोणी केली असेल तर ती फ्रेंच क्रांतीकारकांनी केली आहे. या फ्रेंच क्रांतीच्या पूर्वी समाजाची रचना गुलामगिरीच्या तत्त्वावर आधारलेली होती. श्रेष्ठ, कनिष्ठ, वरचा, खालचा या भेदभावाने समाजाचे बंधारण रचण्यांत आले होते, त्यांत असंख्य दरिद्री व निर्विद्य जनांना स्वातंत्र्याची माहिती नव्हती. नव्हे, त्याचा हक्कहि त्यांना नव्हता. श्रम करणे, धनोत्पादन करणे आणि ते मालकांस देणे व मालक देईल त्यावर जगणे याशिवाय त्यांच्या स्वत:च्या माणुसकींत व जीवनांत कांही अर्थ नव्हता. दारिद्र्याच्या गर्तेत सांपडल्यामुळे संस्कृतीचा सुगंध त्यांना ठाऊक नव्हता व त्यामुळे श्रीमंतापासून समतेच्या वागणुकीची त्यांना कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हती, नव्हे हक्कही नव्हता. या असमानतेचे समूळ उच्चाटन करून समतेच्या व स्वातंत्र्याच्या तत्त्वाचा पुरस्कार केल्यामुळें wea क्रांतीचा दिवस, तो जरी पाळण्यात येत नसला, तरी त्याचे महत्त्व फार मोठे आहे. फ्रेंच क्रांतीनंतर रशियन क्रांतीचा दिवस हा मानवी समाजाच्या विकासाच्या इतिहासांतील दुसरा टप्पा आहे. एका दृष्टींने पाहिले असतांना रशियन क्रांती व फ्रेंच क्रांती यांचा निकटचा संबंध आहे. फ्रेंच क्रांतीत सामाजिक समता व सामाजिक स्वातंत्र्य यांच्यावर भर देण्यांत आला होता. आर्थिक स्वातंत्र्य व आर्थिक समानता यांकडे दुर्लक्ष करण्यांत आले होते. आर्थिक स्वातंत्र्य व आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला नव्हता व जो झाला होता तो अयशस्वी झाला.

tore, परिशिष्ट क्रमांक : १७.