क्रांतीची उपासना कां ध्येयाचे रक्षण - Page 352

390 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

घालण्यास जर्मनीच्या पूर्व बाजूवर जर रशियाने हल्ला केला असता तर फ्रान्स, बेलजियम, नॉर्वे, हॉलंड वगैरे जर्मनीच्या पश्‍चिम सरहद्दीवरल्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य नष्ट झाले नसतेच. जर्मनी या बनावाने हतबल होऊन उभय सरहद्दीवरती एकाच वेळी लढण्यास मात्र असमर्थ होऊन तह करण्यास उत्सुक झाला असता. झाली ही गोष्ट विपरित झाली आणि ती विपरित होण्याचे कारण म्हणजे रशियाचे असमर्थनीय धोरण होय; असे म्हटल्यावाचून गत्यंतर नाही. जर्मनीने फ्रान्स, बेलजियम, नॉर्वे वगैरे पश्‍चिम सरहद्दीवरील राष्ट्रांचे स्वातंत्र्य नष्ट केले इतकेच नव्हें तर, सर्व बाल्कन राष्ट्रांवरती आपले वर्चस्व नव्हे स्वामित्व बसविण्याचा उपक्रम चालविला आहे. झेकोस्लोव्हाकियाचा तर अंत झालाच आहे. रुमानिया जर्मनीने हस्तगत केला आहे. जर्मनीचा साथी इटली याने ग्रीसवरती स्वारी केली आहे. हा सर्व भाग जर्मनी व इटाली या दोन राष्ट्रांच्या स्वाधीन झाला तर रशियाची धडगत नाही. निदान त्याची मोठी कुचंबणा तरी होईल, ही गोष्ट रशियन क्रांतीचे उपासकही कबूल करतील. कारण रुमानिया व ग्रीस ही जर जर्मनीच्या ताब्यांत गेली तर ज्या डार्डनेस्‌च्या समुद्रधुनीवरती आज अनेक वर्षे रशियाचा डोळा आहे ती समुद्रधुनी जर्मनीच्या अतिक्रमणामुळे टर्कीच्या हातून जाऊन जर्मनीच्या हाती लागली तर त्यामुळे रशियाचा भलताच कोंडमारा होईल. रशियाने केलेली मुलुखगिरी एकेवेळी क्षम्य म्हणता येईल. जे जे प्रांत या लढ्यांत रशियाने घेतले ते प्रांत एकेकाळी रशियाचेच होते. रशियाचे क्षेत्र, रशियाचे संख्याबल व आरमारी बळ कमी व्हावे या हेतूने गेल्या लढाईमध्ये रशियाची त्या काळची अनवस्था झालेल्या स्थितीचा फायदा घेऊन हे प्रांत इंग्लंड व फ्रान्स यांनी तहाच्या वेळी रशियापासून तोडून काढले व त्यांची स्वतंत्र राष्ट्रे बनविली. ती रशियाने या युद्धात परत घेतली व आपली आतांची सरहद पूर्वीच्या सरहद्दीला नेऊन भिडविली. हे चालू जमान्याच्या राजनितीला मोठेसे विसंगत आहे, असे म्हणता येणार नाही: परंतु येवढी मुलुखगिरी संपल्यानंतर व माऱ्याचे प्रांत आपल्या सरहहीत सामील करून ती सरहद्द बळकट करण्याचे कार्य संपल्यानंतर रुमानिया व ग्रीस या रशियाला जिव्हाळ्याच्या असणाऱ्या प्रांतावर जर्मनीने मारा केल्यावर तरी रशिया आपल्या धोरणात बदल करील अशी आशा पुष्कळांना होती; परंतु मॉस्कोहून ६ नोव्हेंबर रोजी सोव्हियट सरकारच्या सुप्रीम कौन्सिलचे अध्यक्ष कालीनीन यांनी मॉस्को शहरातील सोविएतच्या सभासदांपुढे ता. २३ ऑक्टोबर रोजी केलेल्या भाषणाचा गोषवारा तारेने इकडे आला आहे. त्या भाषणावरून अशी आशा करण्यास काही आधार उरलेला नाही. त्या भाषणात त्यांनी असे स्पष्टपणे सांगितले की, " ह्या लढाईत कोणतीच बाजू घेण्याचा रशियाचा इरादा नाही. रशिया या लढाईत तटस्थ रहाणार MÈ.