क्रांतीची उपासना कां ध्येयाचे रक्षण ३११
एकेकाळी रशियन क्रांतीचे पुढारी असे म्हणत होते की, रशियामध्ये समता
प्रस्थापित करून भागणार नाही. जर ज्याप्रमाणे मिशनरी लोक आपल्या धर्माचा प्रसार जगभर करीत असतात, त्याचप्रमाणे रशियाने आपले समतेचे तत्त्व जगभर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याकरिता त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून सर्व जगभर आपले हस्तक नेमून, त्यांच्याकरवी समतेची क्रांती करण्याचे कार्य मोठ्या नेमाने चालू केले होते. कालिनिन यांच्य' भाषणावरून पहाता या धोरणात व चालू रशियाच्या धोरणात जमीन अस्मानाचे अंतर पडले आहे, हे उघड आहे. रशिया आज ध्येयाच्या दृष्टीने शून्यवत् झाला आहे. परंतु रशियाने ध्येय सोडले तरीपण त्याने आपला स्वार्थ का सोडावा हे समजणे कठीण आहे. ध्येयासाठी नको असेल तर रशियाने लढू नये. पण ज्या डार्डानेल्सच्या समुद्रधुनीवरती रशियाचे पुढील भविष्य अवलंबून आहे त्याकरिता तरी रशियाने का लढू नये ? केवळ इंग्लीश लोकांचा द्वेष म्हणून जर त्यांच्या बाजूला होऊन रशियाला लढावयाचे नसेल तर ती गोष्ट निराळी आहे. या लढाईत इंग्रज लोकांच्या मूर्खपणाची कमाल आहे ही गोष्ट कोणालाही लपवून ठेवता येणे शक्य नाही. त्यांची वर्तणूक अशी विचित्र झाली आहे की, त्यांना या लढाईत युरोपमधील एक देखील राष्ट्र मित्र म्हणून उरले नाही. रशियाचा तर इंग्लंडने जन्मभर गेली वीस वर्षे द्रोह केला व त्याला केवळ समतेच्या क्रांतीने अस्पृश्य मानून त्याच्याशी कांही वर्षे व्यवहार देखील बंद केला होता. परंतु एवढ्यामुळेच जर इंग्लंडला मदत करावयाची नाही असेच जर रशियाचे म्हणणे असेल तर मग रशिया कोणत्या तोंडाने हिटलरशी दोस्ती करूं शकतो हे आम्हांस उमगू शकत नाही. हिटलरने रशियाचा द्वेष कांही कमी प्रमाणांत केला नाही. नाझी पार्टीची सारी उभारणी रशियाच्या द्वेषावरतीच केलेली होती. रशियाचा नाश करणे हेच एक आपले ध्येय आहे, असा पाठ रात्रंदिवस हिटलर घोषित होता. हिटलरसारख्या शत्रूशी जर रशिया कार्यानिमित्त सख्य करू शकतो तर तशाच प्रकारचे सख्य रशिया इंग्लंडशी कां करू शकत नाही, हे आम्हास कळत नाही. हिटलरचा वृक्ष वाढला, तर त्याचे सावट रशियावर पडून रशियाची वाढ खुंटल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा दिल्याखेरीज आमच्याने रहावत नाही. या लढाईतील रशियाचे वर्तन कसे सदोष आहे, हे आम्ही वर सांगितले आहे. ते रशियन क्रांतीच्या काही उपासकांना मान्य होईल. काहीना मान्य होणार नाही. परंतु रशियन क्रांतीच्या सर्व उपासकांना आम्ही असा प्रश्न विचारू
1 पाहा, परिशिष्ट क्रमांक :१९.