392 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
इच्छितो कीं तुम्ही रशियन क्रांतीची उपासना करीत बसणार की समतेच्या स्वातंत्र्यांच्या ध्येयाचे रक्षण करणार ? क्रांती मोठी की ध्येय मोठे याचा निर्णय सर्वांनी करून वागले पाहिजे. आणि क्राँतीपेक्षा ध्येय मोठे ही गोष्ट निर्विवाद असेल तर रशिया काय करतो, काय न करतो याकडे लक्ष पुरवीत ध्येयाच्या संरक्षणार्थ सर्वांनी चालू लढाईत मनोभावाने भाग घ्यावा हेच सर्वाचे परम् कर्तव्य ठरेल व तीच रशियन क्रांतीची खरी उपासना ठरेल.
*“ रशिया सांगेल तोच धर्म. रशिया करील ते कार्य, अशी अंघभक्ती किती दिवस चालणार ? रशियापासून नेहमीच धडे घेत बसण्यापेक्षा चुकेल त्यावेळी रशियाला धडा देणे योग्य होणार नाही काय ? "१
* : अग्रलेख : जनता, ता, ९ नोव्हेंबर १९४०, उद्धृत, खैरमोडे, खंड ९ वा, पृ. ४५-५०.