“ कामगारशाहीचा विजय असो - Page 355

२०

““कासगारशाहीचा विजय असो”

ता. ७ नोव्हेंबर हा रशियन राज्यक्रांतीचा वाढदिवस आहे. या दिवशी

जगांतील शेतकरी व कामकरी यांनी एकत्र येऊन कामगारशाहीची घोषणा

करण्याचा प्रघात आहे. मुंबईचे कामगार तरी हा दिवस कधीही विसरणे शक्य

नाही. कांही वर्षापूर्वी मुंबईत होऊन गेलेल्या एक दिवसाच्या संपात याच दिवशी

काँग्रेसशाहीने दोन कामगारांचे बळी घेऊन आपल्या बेगडी अहिंसेचे स्वरूप

जगजाहीर केले होते. जगातील कोणत्याही देशांत शेतकरी व कामकरी लोकांचीच

बहुसंख्या असल्याने खरी लोकशाही जगांत नांदावयाची असल्यास कामगारशाहीचाच उदय व्हावयास हवा यांत शंका नाही. जगांतील मानवी समाजांत क्रांती यशस्वी व्हावयाची तर खऱ्या लोकशाहीचा म्हणजे अर्थातच कामगारशाहीचा जगात प्रचार व्हावयास हवा आहे. या दृष्टीने पहाता जगात आजवर झालेल्या क्रांत्या फोलच ठरणार आहेत. इंग्लंडात क्रांती होऊन इंग्लंडची राज्यसूत्रे फक्त धनिक वर्गाच्या हातात गेली व खरी लोकशाही अस्तित्वात येणे ही गोष्ट दुरापास्तं होऊन बसली. फेंच राज्यक्रांतीने 'समता, स्वतंत्रता व बंधुता' या लोकशाही तत्त्वांची घोषणा केली. पण भांडवलदाराच्या हातात राज्यसत्ता जाऊन ती घोषणाही फोलच ठरली. रशियन क्रांतीने एक पाऊल पुढे टाकले आहे, असे म्हणावयास हरकत नाही. पण रशियातील क्रांतीने भांडवलशाहीचा बंदोबस्त केला असला तरी रशियामध्ये एकंदर कामगार वर्गाच्या हातात राज्यसत्ता आलेली नाही, हे त्या क्रांतीचे एक मोठे वैगुण्यं आहे. रशियामध्ये सर्व राज्यसत्ता एका सोटेशाही पक्षाच्या हाती आहे ; तोंवर त्या देशांतही खरी कामगारशाही निर्माण झाली आहे असे कदापि म्हणता येणार नाही. जगांत खरी कामगारशाही व्हावयाची असल्यास तिचा पाया लोकशाहीच्या तत्वावरच रचला गेला पाहिजे. हुकुमशाहीच्या सोटेशाहीने निर्माण झालेली क्रांती ही कधीही चिरस्थायी होणे शक्य नाही.

वरील विचारसरणी खरी असल्यास आपणास जी कामगारशाही हवी आहे ती लोकसत्ताक समाजसत्तेच्या तत्वावर आधारलेली असावग्रास पाहिजे. आपणास हव्या असणाऱ्या लोकशाही कामगारशाहीने मूठभर भांडवलदारापासून व सोटेशाहीपासून अलिप्त रहावयास हवे. असे झाल्याविना एखाद्या नामधारी कामगारशाहीने कामगारवर्गाचे खरे कल्याण होणे, मृगजळाने तहान भागदिण्याइतकेच अशक्य आहे. म्हणून जगात खऱ्या नव्या कामगारशाहीचा संभव होणे असल्यास