९१
ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष
काय असेल तें असो महार जात सर्वांच्या डोळ्यांत सलते. पेशवाईत अस्पृश्यता फार कडक होती. पण तिचा धग जितका महारांना लागला तितका कोणत्याही अस्पृश्य जातीला लागलेला नाहीं. अस्पृश्यांची देखतां डोळा ओळख पटावी म्हणून गळ्यांत काळा दोरा बांधण्याचा नियम निघाला. पण बांधण्यांत आला महारांच्याच गळ्यांत । अस्पृश्यांच्या स्पर्शाने रस्त्यावर पडलेल्या विटाळलेल्या धूळीवर पाय पडूं नये म्हणून त्यांच्या कमरेला खराटा बांधा म्हणजे ती आपोआप लोटून जाईल असा हुकूम पेशव्यांनी काढला. पण तो बांधला गेला महारांच्या कमरेला ! अस्पृश्यांची थूंकी जमीनीवर पडूं नये कारण त्याच्या थुंकीवर पाय पडला तर विटाळ. होतो म्हणून त्यांची थुंकी साठविली जावी व ती रस्त्यावर पडू नये म्हणून त्यांच्या गळ्यांत मडकी बांधण्याचा हुकूम सुटला. पण मडकी बांधली गेली महारांच्या गळ्यांत ! महारांना स्पृश्य हिंदूनी उपद्रव दिला तेवढा अस्पृश्यांतील इतर जातींना कधींच दिला नाहीं. हिंदुचा महारांवरच एवढा कटाक्ष कां याचे कांही कारण उमगत नाहीं. पण उभयतांमधले हाडवैर अगदीं पूरातन आहे हें निखालस खरे आहे. याचे कारण महार जात चळवळी आहे हें असूं शकेल. इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून तर महारानी आपली चळवळ नेटाने सुरूं केली, अस्पृश्य उन्नतीचे भांडण भांडण्याचें कंकण तिनें आपल्या हातीं बांधले. पुण्याला १८८६ सालीं काँग्रेस भरली असतांना हिंदु धर्माचा पुतळा उभा करून जाळला महारांनी. अस्पृश्यांना गुलामगिरींत ठेवून स्वराज्य मागण्याचा तुम्हाला काय अधिकार असा रोकडा सवाल याच कांग्रेसच्या अधिवेशनांत विचारण्यास उभे राहिले ते महारच होते. यामुळें सनातनी हिंदुच्या विरोधाला राजकारणी हिंदुच्या विरोधाचीही जोड मिळाली. गांधींनी अस्पृश्योत्रतीची चळवळ हाती घेतल्यावर तरी महारांना हिंदु लोक जवळ करतील असें वाटलें होतें. परंतु, ती आशासुद्धां निष्फळ झाली. गांधीने स्थापन केलेल्या हरीजन सेवक संघाचे! प्रणेते ठक्कर बापा (ठक बापा नव्हे) यांनीं मुंबई इलाख्यांतील ब्याकवर्ड क्लास बोर्डाकडे तक्रार केली आहे कीं सरकारी सवलतीचा सर्व फायदा महारच घेतात तरी त्याला आळा घालण्यात यावा. खरा प्रकार काय आहे तो चौकशीअंती कळेलच. पण महारांबद्दल हिंदुंच्या पोटात किती विष आहे हैं यावरून स्पष्ट होतें. आतापर्यंत निदान हिंदुच महारांचा द्वेष करीत. त्यांच्या
†पाहा, परिशिष्ट क्रमांक :२०.