ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष - Page 358

३१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

रांगेत चांभार मांग शिरलेले दिसतात. त्यांनीही महारांचा द्वेष करण्याचे कार्य आरंभिलेले दिसते. नव्हे महारांचा द्वेष करण्यापलिकडे दुसरें कांहींच त्यांच्या हातून होत असलेले दिसत नाही. चांभार मांगाची महारांविरूद्ध उठावणी हिंदु लोकांनीच केलेली आहे असा आम्हांस विश्‍वास वाटतो. पण महारांविरूद्ध उठलेल्या चांभार मांगांना आम्हाला इतकेच सांगावयाचे आहे कीं ज्या कांही सवलती मिळाल्य' आहेत त्या महारांच्या श्रमामुळें आणि चळवळीमुळें मिळाल्या आहेत. आणि महारांवर कांहीं आरोप करावयाचे असतील तर जे खरे असतील असेच आरोए करावेत. भलते सलते वायफळ बोलूं नये. हल्लीं हे सत्र महारांविरूद्ध सर्वत्र चालूं आहे. नुकतीच नागपूर येथील नवमतवादी मातंग समाजाची जी मध्यप्रांत-वऱ्हाड महारेतर ' हरिजन ' परिषद, कौंडण्यपूर येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यांत भरविण्यांत आली तींत ह्या खोट्या आरोपाचा पाढा वाचण्यांत आला. या परिषदेंत 'महार समाज महारेतर हरिजनांची पिळणूक करितो ; डॉ. आंबेडकर हे महारेतर हरिजनांचे पुढारी नव्हत, “ असलेही दोन ठराव पास करवून घेण्यांत आले. ही कारवाई कोणाची, हें जाणत्यांना आजमावतां येतेंच. आम्ही वर दर्शविल्याप्रमाणें हा प्रकार अगदींच नवा नव्हे, बराच जुना आहे. पण सध्यां अनपेक्षित होय. कारण, काँग्रेस-कचेरींतून आपण उठविलेल्या सत्याग्रहांत ज्यांना भाग घेतां येत नसेल त्यांनी सूत कांतणें, ग्रामोद्धारासाठीं राबणें व जातीजातींत ऐक्य उत्पन्न करणें हें विधायक कार्यक्रम प्रामाणिकपणे पार पाडावेत, असा गांधींचा आदेश किंवा हुकूम आहे. आणि लेकी बोले सुनेस लागे असली गांधींची भाषा दुटप्पीपणाची नसल्याचा अनेकांना विश्वास असल्यामुळें गांधीगण झिजले, झटले तर देशकल्याणाच्या कामगिरीकरितांच, असा कित्येकांमध्यें समज वाढणें सहाजिकच होय. परंतु वरील परिषद काँग्रेस पक्षाच्या चळवळींतच पैदा झाली आहे, हे पाहिलें म्हणजे सामान्य लोकांची बुद्धि कुंठित झाल्याशिवाय रहाणार नाही.

या आरोपाला महार लोक उत्तर देऊ शकतील, नाहीं असे नाहीं. परंतु, परक्यांनीच कान टोंचलेले बरे, म्हणून राष्ट्रवीरकारानीं या परिषदेतील ठरावावर जी टीका केली आहे, त्यांतील उतारा आमच्या चांभार, मांग बंधूंच्या कान उघाडणी करतां आम्ही उद्धृत करीत आहोंत. त्याचा त्यांनी योग्य तो विचार करावा. राष्ट्रवीरकार म्हणतात :--

“FSR समाज महारेतर हरिजनांची पिळणूक करितों असें म्हणणें केवढें हें कांगावखोरीचें ! यावरून वरच्या महारेतर हरिजन परिषदेंतल्या एकाहि माणसाला कसलेंहि स्वातंत्र्य नव्हतें; सगळे काँग्रेस-पुढाऱ्यांचे पाळीव पोपट होते, हे स्पष्ट सिद्ध होत नाहीं काय? महार समाजाचाही पुढारलेल्या वर्गाच्या पायमळणीत अजून देखील चेंदामेंदा उडत आहे. त्याचे दांत, हात दोनहि मोडले