ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष ३१७
तुटले आहेत, म्हणजे तोही पुढारलेल्या वर्गाकरितां हाडाची काडें करून घेऊन राबत खपत आहे. अशा स्थितींत महारेतर हरिजनाची तो पिळणूक करितो असें अस्पृश्य समाजातल्याच लोकांनी बोल काढावे, हे देशाचेच दुर्भाग्य ! महार समाजाच्या हातांत सावकारी, कारखानदारी, डॉक्टरी, वकिली, दलाली नी अंमलदारी यापैकीं कोणलाहि एक धंदा अधामुर्धा नव्हे, तर गिर्धासुद्धा नाही. अशा स्थितींत तो महारेतर हरिजनांची पिळवणूक करितों ती कोठें ? घरच्या सुनेच्या हरकतीस न जुमानतां शिंक्यावरच्या लोण्याचा फन्ना उडवीत असतांना सासूबाई येतांच गोपाळ कृष्णानें शेवटच्या घासाचे बोटास लागलेले लोणी त्या सुनेच्या तोंडास फांसलें आणि आपण बाजूला होऊन, त्या सुनेला सासूच्या तोंडाला दिलें तसलीच ही चाणक्यचंडिरामाची कारवाई नव्हे काय ?
परिषदेत अध्यक्ष मि. वऱ्हाडे यांनीं भाषण केल्याप्रमाणें बोर्ड, असेंब्ली वगैरेंच्या निवडणुकीत अस्पृश्य समाजांतील महार जातीचे उमेदवार महारेतरापेक्षां अधिक यशस्वी होत असतील; नव्हे होतातहि. परंतु महार समाज बहुसंख्य आहे त्याचाच तो परिणाम होय. आणि निवडणुकींत पोटसमाजांत बरोबर वांटणी
पाडून देण्याइतकें पुढारीपण केव्हांही निर्माण होणे शक्य नाहीं. गांधी-नेहरूसारखे महान पुढारी काँग्रेस पक्षाला असतांहि सातहि प्रांतांचे मुख्य प्रधान अत्यल्पसंख्य बामण जातींतलेच झाले ! तेव्हां निवडणुकीत महारेतर हरिजनांना वास्तविक वांटा देण्यांस डॉ. आंबेडकर समर्थ नाहींत; म्हणून अस्पृश्य समाजाचे ते पुढारी नव्हेत, असा बोलवित्या धन्याकरितां सूर काढणें म्हणजे आपला आपणच घात करून घेणें होय. आणि म्हणूनच अस्पृश्यांतील मांग समाजाला डॉ. आंबेडकर लांबचे वाटूं लागले असून उमरावतीच्या डॉ. सबणीस सारखे लोक जवळचे आणि कल्याणकर्ते वाटत आहेत ! एकूण काय बहुजन समाजाचा उद्धार करणे आणि त्याला पुढारलेल्या वर्गाच्या दाढांतून बाहेर काढून घेणे ही कामगिरी बरीच कठीण आहे पण ती समाजसेवकांस केलीच पाहिजे. “
७ ७ ७
सदरहू लेख जनता दिनांक ४ जानेवारी १९४१ च्या अंकात ' संकीर्ण समालोचन ' या सदराखाली प्रसिद्ध झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक १३ जुलै १९४० च्या जनतेच्या अंकात ' जनतेंसाठी लेख लिहिण्याचे जाहीर केले होते. दिनांक ११ जानेवारीच्या ' जनते ' च्या अंकात ” चालू आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजारपणामुळे ' संकीर्ण समालोचन ' हे सदर या अंकात देणे शक्य झाले नाही तरी ते पुढील अंकात देण्यात येईल “ असा संपादकाने खुलासा
केला आहे.
यावरून मागील आठवड्याच्या दिनांक ४ जानेवारी १९४१ च्या जनतेच्या अंकात ' संकीर्ण समालोचन ' या सदराखाली जे दोन समालोचन प्रसिद्ध झाले आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहेत हे स्पष्ट होते.
i ++संपादक, वाय ६४१-२३