९२
राजकारणांतला नवा सांप्रदाय *
लिबरल लोकांच्या राजकारणाला ते निष्क्रीय आहे या सबबीवर तो एक हसण्याचा विषय होऊन बसला आहे. याबद्दल आम्हाला काही म्हणावयाचे नाही. या निष्क्रियतेमुळेच लिबरल पक्ष अस्थीपंजर उरला आहे. परंतु, निष्क्रिय राजकारणापेक्षा निष्ठाविहीन राजकारण फारच निंद्य आहे याचा कोणी विचार देखील करीत नाहीं. अशाप्रकारचे निष्ठाविहीनं राजकारण आज तितके फैलावत चालले आहे हे कोणास सांगावयास नको. एकच माणूस दोन दोन, तीन तीन संस्थांतून प्रवेश करून घेतो व उजळ माथ्यानें त्यांतून वावरतो व दोन्ही तिन्ही ठिकाणी अधिकारपदहि भोगतो. त्या संस्थांच्या ध्येयांत साम्य आहे किंवा विरोध आहे त्याचा विचार सुद्धां त्यांच्या मनाला शिवत नाहीं. खुद्द हिंदु महासभेचे अध्यक्ष यांची अशीच स्थिती आहे असे म्हणतात. ते हिंदुमहासभेचे बहुतेक कायमचेच-अध्यक्ष तर आहेतच. पण ते चित्पावन ब्राह्मण सभेचेही अध्यक्ष आहेत असें समजतें. असाच एक नवा प्रकार ना. बेळवी यांच्या संबंधानें घडलेला उघडकीस आला आहे. एकेकाळी ते काँग्रेसचे भक्त होते. नंतर ते काँग्रेस मधून बाहेर पडले. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यांत ते बेलगाव जिल्हा हिंदु महासभेचे अध्यक्ष झाले व आता नुकतीच कर्नाटकांतील ब्राह्मण सभेची बेलगाव शहरांत एक शाखा उघडण्यात आली, तिचेही अध्यक्षपद स्वीकारण्यास ते पुढे आलें. या विचित्र निष्ठाहीन राजकारणाचा काहीं उलगडा होऊच शकत नाहीं. याचे कारण सवंग लोकप्रियता कां ज्ञाती स्वार्थ याचा खुलासा होणें अत्यंत अवश्य आहे. या बाबतींत राष्ट्रवीरकारांनीं काढलेले विचार मननीय आहेत. ते
म्हणतात :--
'' वरील सभेची बेळगांवला शहर-शाखा निर्माण झाली असून, तिचे अध्यक्ष श्रीयुत दत्तोपंत बेळवी हे आहेत. बेळवीचे पाऊण अधिक आयुष्य कॉंग्रेसमध्ये पुढारीपणाचा उपभोग घेण्यात गेलें असून तारीख १४ नोव्हेंबर १९४० रोजीं बेळगांव जिल्हा हिंदु महासभेचेहि त्यांना अध्यक्ष बनविण्यात आलें आहे. असें असता, वरील प्रकार पुढे यावा हैं बहुजन समाजाला मोठें कोडेंच झाले असलें पाहिजे. पण बामण शेवटीं जातीवर जाणार. त्याला राष्ट्र नि धर्म याची:
"पहा. “ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष' या लेखा खालील संपादकीय टीप--संपादक.