राजकारणांतला नवा सांप्रदाय * ३०९
स्वार्थसिद्धीपलीकडे माया नाही. जें आमच्यांतील कित्येकांचे जाहीर मत आहे. ते या ठळक उदाहरणानें अगदी सोळा आणे खरे ठरले. जातिविशिष्ठ चळवळीला श्री. बेळवींनी नांवें ठेविलीं नसती, तर असे येथे त्यांना पुढें खेचण्याचे आम्हास कांहीच प्रयोजन नव्हतें. परंतु यांनीं काँग्रेसच्या पवित्र्यावरून जातीय चळवळीला मेलेल्रा विरोधामुळे बहुजन समाजाचे आतांपर्यंत भारींच नुकसान झाले आहे व पुढारलेल्या वर्गाची परस्वापहार वृत्ति भयंकर बळावलेली आहे. तेव्ह आपण जाणते आहों असें बहुजन समाजातील ज्या कोणास वाटते, त्यांनी आत्महितार्थ तरी समाज संघटनेची कास धरणे अपरिहार्य झालेलें नाहीं काय ?
अशा या दाखल्यामुळें हिंदु महासभेचा प्रश्न गंभीर विचाराचा झालेला नाही काय ? कारण कर्नाटक हिंदु महासभेचे अध्यक्ष सर सिद्दाप्पा कांबळी हें असून, बेळगाव जिल्हा हिंदुमहासभेचे उपाध्यक्ष रा. ब. अण्णासाहेब चौगुला हे आहेत. आपला धर्म तशी संस्कृति हिंदुंहून भिन्न आहे व तसा येत्या खानेसुमारींत स्वतंत्र उल्लेख झाला पाहिजे, अशी लिंगायत व जेन समाजाची चळवळ जोरांत चालूं आहे आणि म्हणून मुसलमानांप्रमाणें हिंदुमहासभेचें कार्य संघटित धोरणाने चालेल कार, असा आक्षेप निघत असतो. त्यांत श्री. दत्तोपंत बेळवी ब्राह्मण्सभाहि स्वतंत्र चालविणार आहेत या अनिष्ट गोष्टीची भरती पडत नाहीं काड? सार्वजनिक मुखवट्य'ने पुढारलेल्या वर्गातले बामण ठरैरे समाज हिंदूंतल्या इतर जातींच्या! हक्कांची पायमल्ली करून, त्यांच्या प्रगतीच्याहि आड येतात म्हणून बहुजनसमाजातहि जातिविशिष्ट चळवळीस जन्म मिळाला नि त्यामुळेच हिंदू म्हणून संघटना निर्माण होणें कठीण झालें. अर्थात तें घातक ठरलें व यासाठींच पुनः दृढतर हिंदुसंघटनेची गरज उत्पन्न करण्यांत येते आणि हिंदुंतल्या पुढारलेल्या जातींची घर्मवैशिष्ठ्यास तिलांजली 'दिल्यांशिवाय इतःपर हिंदुंचा बळकट एकोपा अशक्य आहे, AR गोष्ट कोणी अमान्य करीत नाहींत. अशा Ruda श्री. दत्तोपंत बेळवी रचे ब्राह्मण्यप्रेम आणखी दुप्पट उसळावें, ह' हिंदुमहासभेच्या पहिल्या घासांतच मक्षिकापात नव्हे काय ? जर आम्ही हिंदुमहासभेचे जूं मानेवर घेणाऱ्या बहुजनसमाजांतल्या भावनाप्रधान लोकांना थोडी सबुरी पत्करा अशी सल्ला दिली तर ती अस्थानी होईल काय ? “१
0 छे ©
“ : जनता, ४ जानेवारी १९४१.