बरे झाले, महात्मा गेला, माणूस राहिला ३२१
गेल्या महिन्या दीड महिन्यात गांधीनी अहिंसेच्या बाबतीत अनेक विधाने केलेली दिसून येतात. कर्नल एमरी यांनी गेल्या महिन्यात २३ तारखेस पार्लमेंटमध्ये जे भाषण केले त्या भाषणाला गांधींनी ता. २८ एप्रिल रोजी उत्तर म्हणून एक लांबलचक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्या पत्रकात गांधीनी कर्नल एमरी यांना उद्देशून खालीलप्रमाणे उद्गार काढले आहेत.
गांधी म्हणतात “ मी ब्रिटिश सरकारला एक प्रश्न विचारू इच्छितो. दीडशे वर्षे ब्रिटिशांनी आपले राज्य प्रस्थापित केल्यानंतरदेखील काही मुठभरशा गुंडांच्याविरूद्ध हिंदी लोकांना उभे राहण्याची ताकद कां आली नाही ? खरोखरीच हिंदी लोकांपेक्षा ब्रिटिश लोकांना जास्त लाज वाटली पाहिजे की हजारो लोक काहीशा गुंड लोकांच्या भीतीला घाबरून आपले घर सोडून पळून जातात ! राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी जर कोणती असेल तर प्रजेला आत्मसंरक्षणाचे शिक्षण देणे हेच होय. परंतु परकीय ब्रिटिश सरकारला हिंदी प्रजेच्या संरक्षणाच्या बाबतीत काही जबाबदारी वाटली नाही, आणि म्हणून प्रजेला हत्यार ठेवण्याची त्यांनी मनाई केली. "
कर्नल एमरी यांनी पार्लमेंटमध्ये हिंदी सैन्याच्या बाबतीत जे शाबासकीचे व अभिनंदनाचे उद्गार काढलेले आहेत त्याचा हिंदुस्थानात कोणत्याही प्रकारचा परिणाम होणे शक्य नाही. कारण हिंदुस्थान देशाला युद्ध सामुग्रीच्या दृष्टीने समृद्ध केले असते आणि हिंदी लोकांना लष्करी शिक्षण दिले असते तर युरोपातील कोणतेही राष्ट्र ब्रिटिश साम्राज्याच्या वाटेस जाणे शक्य नव्हते. [“ ]
चालू महिण्याच्या २ तारखेला गांधी यांनी अहमदाबाद येथील जो हिंदू- मुसलमानांचा दंगा झाला त्या दंग्याच्या बाबतीत एक कमिटी स्थापन केली आहे. त्या कमिटीचे अध्यक्ष श्री. भोगीलाल यांना गांधीनी पत्र लिहिले आहे. त्यात हिंसा-अहिंसा या विषयावर गांधीनी आपले मंत प्रदर्शित केले आहे. त्यातील खालील वचने ध्यानात ठेवण्याजोगी आहेत.
'' गुंडांच्या भीतीने जीव घेऊन लोकांनी पळावे ही गोष्ट असह्य होय. गुंडांचा प्रतिकार हिंसेने व अहिंसेने करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असले पाहिजे. 'ब्रीदचा ' मी करीत असलेला अर्थ जर खरा असेल तर काँग्रेसवाल्यांनी अहिंसेनेच प्रतिकार करावा त्यात ते यशस्वी होतील. परंतु पळून जाणे हा भ्याडपणा असल्याचे आपण लोकांना अगदी स्पष्ट सांगितले पाहिजे. अहिंसेने प्रतिकार करण्यास ते असमर्थ असतील तर त्यांनी हिंसेने प्रतिकार करणे हे त्यांचे कर्तत्व आहे. “