3२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
“ स्वत:चे अगर दुसऱ्याचे संरक्षण हिसेने करावे असे म्हणणारे लोक काँग्रेसमध्ये किती ares ते तुम्ही पाहिले पाहिजे. जर कॉग्रेसच्या बहुमतवाल्याचे असे मत पडले को, गुंडांच्या हल्ल्याविरूद्ध हिंसात्मक प्रतिकार केलाच पाहिजे व तो करणे हे कॉँग्रेसच्या ध्येणाविरूद्ध नाही तर त्यांनी तसे उघड जाहीर करून त्याप्रमाणे जनतेला मार्गदर्शन करावे. “
'“ जीवित संरक्षणासाठी गुंडांना भिऊन जनतेने पळ काढावा हा सहन न होणारा प्रकार आहे. त्याचा हिंसात्मक अथवा अहिंसात्मकरीतीने प्रतिकार करण्याची शक्ती असणे जरूर आहे. “
“ कॉँग्रेसने लष्कर अगर पोलिसाची मदत मागू नये. ज्यांचा अहिंसेवर विश्वास आहे, त्यांनी सरकारी मदत मागावी, “
' ज्या ठिकाणी हिंसात्मक शारीरिक शिक्षण देण्यात येते अशा आखाड्याशी काँग्रेसने संबंध ठेऊ नये. "'
“ दंग्यातील नुकसानीबद्दल काँग्रेस मोबदला मागणार नाही. ते काँग्रेसचे कार्य नाही. स्वसंरक्षणात कमकुवत असल्यामुळे जनतेने नुकसान सोसलेच पाहिजे व त्यांनी ते सहन केले पाहिजे. "'
““ भय्या, शीख अथवा ठाकूर यांचेकडून संरक्षण घेणे याची मला कल्पनाही करवत नाही. "
मुसलमानी वस्तीत राहणाऱ्या हिंदूंनी तेथून हलू नये. जीवित धोक्यात घालूनदेखील तेथेच राहावे. “
“ हिंदू वस्तीत राहणाऱ्या मुसलमानांना हिंदूंनी पूर्ण संरक्षण द्यावे. “
जी कोणी, गांधीनी इंग्लिश लोकांना १९४० साली लिहिलेले पत्र व १९४१ साली केलेली ही वरील विधाने ताडून पाहील तो काय म्हणेल ? जो गांधी एकेकाळी इंग्रजलोकांना तुमची शस्त्रास्त्रे फेकून द्या, लष्करी वृत्तीचा त्याग करा, असे सांगत होता तोच गांधी हिंदुस्थानातील लोकांना लष्करी शिक्षण का दिले नाही, शस्त्रास्त्रची निर्मिती का केली नाही व हिंदी लोकांना हिंसक लोकांपासून संरक्षण करण्यास का शिकविले नाही, असे दात ओठ चावतो; आणि त्याचा जळफळाट होतो. या माणसाला काही तत्त्व आहे किंवा नाही, त्याची बुद्धी स्थिर आहे किंवा नाही, याबद्दल कोणाच्या मनात संशय उत्पन्न झाल्यास त्याला कोण दोष देईल ? जो गांधी एक वर्षापूर्वी इंग्रज लोकांना उपदेश करीत होता की, तुम्ही सशस्त्र प्रतिकार करू नका, हिटलर व मुसोलिनी यांना आमंत्रण en व ते