बरे झाले, महात्मा गेला, माणूस राहिला ३२३ च
आले तर घरेदारे खुली करून जे लागेल ते त्यांना नेऊ दा, तोच गांधी अहमदाबादच्या लोकांना आज स्पष्टपणे सांगतो की तुम्ही आपली घरेदारे सोडून पळून जाऊ नका; पळून जाणे हा भ्याडपणा आहे; अहिंसेने तुम्हाला प्रतिकार करता येत नसेल तर हिंसेने करा. असा हा चंचल वृत्तीचा माणूस लोकांनी मार्गदर्शक कसा मानावा, असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर त्याला गैर म्हणता येईल काय? जो गांधी प्रतिकार न करणे, परपीडा सहन करणे आपले तत्त्व आहे म्हणून सांगत बसला होता तोच गांधी प्रतिकार करणे आवश्यक आहे-नव्हे अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार करता आला नाही तर हिंसात्मक मार्गाने करणे आवश्यक आहे, असे आता सांगतो. तेव्हा त्याला बुद्धिभ्रंश झाला, अशी शंका जरी घेतली तरी ती निरर्थक व विकारवश, असे म्हणता येईल काय ? जो गांधी अहिंसः सर्वानी पाळावी असा आग्रह धरून बसला होता तोच गांधी अहिंसा फक्त काँग्रेसच्या लोकांनी पाळावी, असे म्हणतो! जो गांधी एकदा म्हणत असे की काँग्रेसच्या लोकांनी अहिंसा पाळलीच पाहिजे तोच गांधी आता म्हणतो को काँग्रेसच्या लोकांनी जर बहुमताने ठरविले की गुंडाशाहीचा हिंसक मार्गाचा अवलंब केल्याखेरीज प्रतिकार होणे शक्य नाही, तर त्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करण्यास लोकांना सांगण्यास हरकत नाही ! यावरून गांधीचा अहिंसेच्या तत्त्वावर विश्वासच नव्हता, असा आरोप केल्यास तो अन्यथा होईल काय ? अहिंसेवरील गांधींची परस्पर विरोधी विधाने वाचल्यावर कोणीही माणूस गोंधळून गेल्याशिवाय राहणार नाही. ही वचने म्हणजे जबाबदार माणसाची घोषणा मानावयाची, वेड्याचे बरळणे समाजावयाचे, महात्म्याची लहर म्हणावयाची किंवा एखाद्या वाण्याच्या हिशोबी वृत्तीचे रचलेले पुराण म्हणावयाचे याचा काही.थांग लागू शकत नाही.
काही असले तरी गांधींची हल्लीची अहिँसेंसंबंधीची वृत्ती ही गांधीची दुर्दशा आहे, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. कारण एकदा एक मत व दुसऱ्यांदा त्याच्या उलट मत देण्याचा प्रसंग येणे यासारखी दुसरी दुर्दशा कोणती असू शकणार ? कधी कधी माणसाला आपले मत बदलावे लागते. कारण मत हे परिस्थितीला धरून असते. परिस्थिती बदलली तर मतही बदलावे लागते. पण मत बदलले तरी माणूस आपले तत्त्व बदलू शकत नाही. मत बदलणाऱ्या माणसाला जरी कोणी लबाड म्हटले नाही तरी तत्त्व बदलणाऱ्या माणसाला हा लबाड आहे, असे म्हटल्याखेरीज कोणी राहणार नाही. गांधीच्या अहिंसेच्या भूमिकेत जो फरक पडला आहे तो फरक मतांतराचा नसून तत्त्वाच्या स्वरुपाचा आहे, याबद्दल शंका नाही. एकदा सांगितलेले तत्त्व माघारे घेण्याचा प्रसंग यावा यासारखी दुसरी दुर्दशा कोणती ? या दुर्दशेची कारणे जाणून घेणे अवश्य आहे.