बरे झाले, महात्मा गेला, माणूस राहिला ३२५
हिंदुस्थानात शंकराचार्य, माधवाचार्य, रामानुजाचार्य असे आचार्य झाले हिंदुस्थानात तुकाराम, गोरा कुंभार चोखामेळा वगैरे साधूसंत झाले. पण गांधींच्यापूर्वी कोणी महात्मा झाला नाही, असे पुष्कळ लोक गौरवाने सांगतात. हल्लीच्या पुष्कळ लोकांना आचार्य, साधू-संत हे व्यर्थ जन्माला आले असे वाटते. त्यांनी देशाच्या उन्नतिकरिता काही केले नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे हे जरी खरे असले तरी आचार्य साधू-संत या देशात जन्मले याला काही आपत्ती म्हणता येणार नाही; पण या देशात महात्मा उत्पन्न झाला ही मोठीच आपत्ती आहे, असे आम्ही समजतो. त्या दिवशी गांधीला महात्मा पदवी देण्यात आली तो दिवस देशाच्या इतिहासात मोठा दुर्भाग्याचा आणि ज्या पुरुषाला, गांधीला महात्मा ही पदवी देण्याची बुद्धी झाली, त्याला काळपुरुष समजण्यास हरकत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. महात्मा सर्व परीने जनतेवर आपत्ती आहे. जनतेला यम पाहिजे, नियम पाहिजे, जनतेला कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती चोरवाळून पाहिल्याखेरीज गत्यंतर नाही. सत्य म्हटले तर पुरावा मागीतला पाहिजे. आज्ञा म्हटली तर परिणामाची छाननी केली पाहिजे. पण महात्म्याला यम नाही, नियम नाही. महात्मा म्हणेल ते सत्य आणि सांगेल ती आज्ञा. तसे अचार्य व साधू-संत यांचे नाही. आचार्य व साधू-संत यांच्याशी खऱ्या खोट्या, बऱ्या वाईटाचा वादविवाद करता येतो. ते यम नियमाच्या, तकशास्त्राच्या बंधनापलिकडे नाहीत. एकदा महात्मा मानला, मग त्याला 'हे असे का ?' असे विचारण्याची WISTS राहात नाही. कारण महात्मा आणि परमेश्वर यांच्यात भेद नाही. महात्मा म्हणजे परमआत्मा म्हणजे परमेश्वर अशी जगाची समजूत आहे. तसे आचार्य व साधू-संत नाहीत. - ते मार्गदर्शक आहेत. मोक्षदाते नाहीत. महात्मा हा नुसता मार्गदर्शक नसून तो मोक्षदाता आहे, अशी सर्वसाधारण लोकांची कल्पना आहे. आचार्यांना, साधूसंताना लोक वंदितात. महात्म्याला लोक अनन्यभावे शरण जातात.
शरणागती म्हणजे एक आफत्तीच आहे. तिच्याइतकी दुसरी मोठी आपत्ती कोणतीच असू शकणार नाही. कारण ती मानसिक गुलामगिरी आहे आणि मानसिक गुलामगिरीत जे लोक सापडले त्यांची प्रगति खुंटली जाते, याची साक्ष साऱ्या जगाचा इतिहास देत आहे.
लोक खुळे असल्याखेरीज महात्मेगिरी चालू शकत नाही, आणि महात्मेगिरीचा पगडा लोकांवर बसला म्हणजे लोक खुळे होतात, गुलाम बनतात. आपत्तीतून सुटका होण्यास महात्मेगिरीचा बिमोड होणे हाच एक उपाय आहे. गांधीची महात्मेगिरी अहिंसेवरच उभारलेली होती व अहिंसेच्या घोषणेमुळे ती टिकून