बरे झाले, महात्मा गेला, माणूस राहिला - Page 368

३२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

राहिली होती. आमची खात्री आहे की गांधीने अहमदाबादचा दंगा झाला नसता तर अहिंसेची घोषएण मरेपर्यंत सोडली नसती. आणि अहिंसेचे घोर परिणाम माहीत असतांनाही जगाला तरण्याचा-अहिंसेचा-नवा मार्ग सांगणारा महात्मा म्हणून मरण्याची आपली हौस पुरवून घेतली असती. पण गांधी शुध्द दुर्दैवी ठरला इतका को गांधीच्या दारात बसलेला परमेश्वरही त्याला सहाय्यक झाला नाही. अहमदाबादच्या दंग्याचा प्रसंग म्हणजे गांधीचे मोठेच दुर्दैव म्हणावयाचे. जितक्या परीने गांधीचे दुर्दैव तितक्याच परीने हे देशाचे सुदैव म्हणणे प्राप्त आहे. अहमदाबादच्या प्रसंगामुळे एक गोष्ट फार नामी झाली. अहिंसा ही गांधीने महात्मेगिरी चालू ठेवण्याकरिता अंगाला लावलेली राखुंडी आहे, हे सिद्ध झाले आहे. स्वतःच्या बडेजावाकरिता अहिंसेची चिता चेतविली आणि स्वंकीयाचा बचाव करण्याकरिता आता ती विझविली | एकंदरीत गांधीची अहिंसा म्हणजे एक मोठे ढोंग होते हे अहमदाबादने सिद्ध केले. देशाचे सुदैव उदयाला आले, असे आम्ही समजतो,

ज्या दिवशी गांधीला अहिंसेचे बाबतीत कच खावी लागेल त्या दिवशी गांधीची महात्मेगिरी नाहीशी व्हावयास लागेल, हे आमचे फार दिवसापूर्वी केलेले भाकीत आहे. या दृष्टीने पाहता अहमदाबादचा दंगा ही इष्टापत्तीच आम्ही समजतो. कारण अहमदाबादला हिंदू-मुसलमानाचा दंगा झाला नसता आणि तेथील हिंदूंची अहिंसेमुळे धुळधाण झाली नसती तर गांधी अहिंसेचे ढोंग आपल्या बडेजावाकरता तसेच उराशी धरून बसला असता.

अहमदाबादच्या दंग्याने बरे झाले राख उडाली, कोळसा राहिला, महात्मा गेला, माणूस राहिला, असे आशेचे उद्गार काढण्याला जागा झाली. म्हणून अहमदाबादच्या हिंदूंचे तसेच मुसलमानांचे आम्ही अभिनंदन इच्छितो,

छ छ छै

अग्रलेख : जनता, ता. ११ मै १९४१.

उद्घृत, गांजरे, खंड ४, पू. १८६-१९२.