बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व - Page 369

tJ

बुद्धलयंती आणि तिचे राजकीय महत्त्व

हिंदुस्थानातील लोक उत्सवप्रिय आहेत हे काही कोणास सांगावयास नको. वर्षांतून अर्ध अधिळ त्यांचे दिवस उत्सवात. आणि सणात जातात. त्यातल्या त्यात देशातील महान व्यक्तींच्या जन्म-मरणाच्या उत्सवांना तर ते फारच महत्त्व देतात. कृष्णजन्माष्टी, रामनवमी, हनुमानजयंति हे उत्सव त्यांच्या या मनोभावनेची साक्ष देतात. असे असताना हिंदुस्थानातील हिंदू लोक बुद्धाची जयंती साजरी करीत नाहीत याचे कोणाही परकीय माणसास आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. ज्या विभूती हिंदुस्थानात निर्माण झाल्या त्यांत बुद्धाचे स्थान फार उच्च प्रतीचे आहे. जगाला प्रकाशित करणारा तेजस्वी सूर्य अशी महती गाणारे बुद्धाचे काही भक्तगण आहेत. खिस्ती लोक, ज्यांना बुद्धाबदल हेदा दाटतो, ते देखील एशिया खंड प्रकाशित करणारा सूर्य अशी त्यास उपमा देतात. हिंदू लोकही त्याला विष्णूचा अवतार मानीत असल. अशा र" विख्यात पुरुषाची या देशातील लोकांना आठवण देखील राहिली नाही. बाजीरावाने ठेदलेली रांड मस्तानी हिचे नांव ज्यांना माहित आहे, असे सामान्य लोक आज पुष्कळ सापडतील. पण बुद्धाच्या नावाचा परिचय असलेले सामान्य लोक यांच्यापेक्षा फारच कमी सापडतील अशी मला शंका वाटते. एवढ्या मोठ्या विभूतीची एव्हढी मोठी विस्मृती व्हावी, ही मोठी सखेदाश्चर्याची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत आनंदाची ही गोष्ट की, बंगाल व इतर प्रांतांत बुद्धजयंतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पण आमच्या मते या उत्सवाला फारच मोठे राजकीय महत्त्व आहे. ते पटवून देण्याकरिता गौतमबुद्धाचे चरित्र व त्याचे कार्य याचा जनतेला परिचय करून देण्याचे आज आम्ही योजिले आहे.

अडीच हजार दर्षापूर्वी शुद्धोधन नावाचा साक्य वंशातील एक राजा कपिलवस्तु येथे राज्य करीत होता. शुद्धोधन राजाच्या कुळाचे नाव गौतम असे होते. कपिलवस्तु हे ठिकाण आजच्या हिंदुस्थानातील संयुक्त प्रांत म्हणतात त्या प्रांतांत होते. ले वस्ती व अयोध्या यांच्या मधोमध असून फैजाबादपासून पूर्वेकडे ५० मैलावर होते. शुद्धोधन राजाच्या दोन पत्नी होत्या. एकीचे नाव मायादेवी व