बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व - Page 370

32¢ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दुसरीचे नाव प्रजापति असे होते. शुद्धोधन व मायादेवी यांचे लग्न झाल्यावर काही दिवसानी मायादेवी गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर पहिले बाळंतपण माहेरघरी व्हावे, अशी पूर्वापार चाल असल्या कारणाने मायादेवीचा बाप सुबुद्ध याने मुलीस बाळंतपणास आपल्या गावी पाठवावी म्हणून त्यांचा जावाई शुद्धोधन यास निरोप पाठविला. त्याप्रमाणे मायादेवी व तिची बहीण प्रजापति या उभयता लवाजम्यानिशी आपल्या माहेरी जावयास निघाल्या. वाटेत त्यांना लुंबीणी वन लागले. व त्या ठिकाणी मायादेवी हीस प्रसूतिवेदना सुरू झाल्या व त्या वनात ती बाळंत होऊन पुत्ररत्न प्रसवली. प्रसूत झाल्या बरोबर मायादेवी मरण पावली. व त्या मुलाचे संगोपन तिची बहिण प्रजापति हिने केले. त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. हाच पुढे गौतमबुद्ध म्हणून प्रसिद्धीस आला.

क्षत्रिय कुळात व राजघराण्यात जन्माला आल्यामुळे त्याच्या परिस्थितीला साजेल असे शिक्षण सिद्धार्थाला देण्यात आले होते. क्षत्रियाचे लष्करी शिक्षणच देण्यात आले होते असे नव्हे तर त्याचा वेदाभ्यासही चांगलाच झाला होता. परंतु सिद्धार्थाचा एकंदरीत मनाचा कल एकांताकडे होता. राजवैभव उपभोगण्याकडे त्याचा विशेष कल नव्हता. आपला पुत्र कदाचित संन्यास घेऊन भलत्याच मार्गाला लागेल या भीतीने शुद्धोधनाने आपल्या मुलाचे लग्न करून त्यास संसारात डांबून टाकण्याचा निश्चय केला. व त्याप्रमाणे दंडपाणी याची मुलगी, जिचे माहेरचे नाव गोपी व सासरचे नाव यशोधरां, हिच्याबरोबर लग्न लावून दिले. व या लग्नापासून सिद्धार्थ गौतमास राहूल या नावाचा एक मुलगा झाला. शुद्धोधनाने आपल्या मुलाला ऐषआरामात राहाता यावे म्हणून तीन मोठमोठे राजवाडे बांधून दिलेले होते. त्याच्या ऐषआरामात कोणत्याही प्रकारची न्यूनता राहू नये, अशा प्रकारची व्यवस्था केली होती.

एके दिवशी गौतमाने गावातून हिंडून येण्याचा व एकंदरीत सामाजिक परिस्थिती पाहून येण्याचे ठरविले व त्याप्रमाणे रथ जुंपून तो राजवाड्यातून बाहेर पडला. शहरात शिरल्यानंतर चार गोष्टी त्याच्या नजरेस पडल्या. प्रथम एक अत्यंत वृद्ध, जराग्रस्त, गलितगात्र, दंतभग्न, चेहऱ्यावर सुरकत्या पडलेल्या, केस सगळे पांढरे झालेले, पाठीची कमान झालेली, हातात काठी धरून मुंगीच्या मंदगतीने तोंडातून काहीतरी अस्पष्ट बोलत व सर्व शरीर कंपायमान होत असलेला त्याच्या नजरेस पडला. पुढे गेल्यावर त्याला दुसरे दृश्य दिसले. एक माणूस भंयकर तापाने ग्रस्त झालेला, अत्यंत अश्क्त व बेशुद्ध, निराश्रीत असा वाटेवरती पडलेला दिसला. आणखी पुढे गेल्यावर एका माणसाचे प्रेत तिरडींवर घालून