बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व ३२९ त्याचे नातेवाईक व त्याचे मित्रगण वाहून नेत होते. त्याच्यापुढे एक संन्यासी प्रफुल्ल मनाने व शांत चित्ताने हातात भिक्षापात्र घेऊन चालला होता हे चौथे दृश्य पाहिले. ही चार दृश्ये पाहून गौतमाच्या मनावरती मोठाच परिणाम झाला. या चार दृश्यावरून त्याने बोध घेतला (तो हा) की जगात दुःख आहे. मनुष्य जीवीत हे अशाश्वत आहे. असे जर नसते तर उपजलेला मनुष्य रोगग्रस्त न होता ! वृद्ध न होता !! आणि मरण न पावता !!! एकंदरीत चौथे दृश्य म्हणजे संन्यासवृत्ती हेच खरे ध्येय होय असे त्यास वाटले. आणि म्हणून ज्या जगात दुःख आहे जरा आहे, आणि मरण आहे अशा संसारात काहीच अर्थ नाही, असे त्यास वाट् लागले. अशा विचारांच्या जाळ्यात सापडून तो परत घरी आला. परत येताच त्याची पत्नी यशोधरा प्रसूत होऊन तिला एक मुलगा झाल्याचे वृत्त त्याला कळविण्यात आले. ही एक जादा बेडी आपल्या पायांत पडली, असे त्यास वाटले. तथापि संन्यास घेण्याचा त्याचा निश्चय कायम झाला होता. व त्याप्रमाणे त्याने आपला निश्चय त्याचा बाप शुद्धोधन यास जाऊन कळविला. अर्थात गौतमाने असे काही करू नये म्हणून राजवाड्यामध्ये नाना तऱ्हेचे करमणुकीचे, मनरंजनाचे प्रयोग करून या निश्च्चयापासून गौतमास परादृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु गौतमाचा निश्चय (पक्का) झालेला होता. तथापि राजाला कळविल्याखेरीज पळून जाणे योग्य नाही, म्हणून आपला मनोदय अमलांत आणण्याचा आपण निर्धार केला आहे, हे सांगण्याकरिता तो राजवाड्यांत गेला आणि बापास म्हणाला की, "मला तुम्ही अडथळा करू नका. तुमचे राज्य, तुमचे प्रजाजन, तुमची संपत्ति तुम्ही घ्या. मला काही नको.” दुसऱ्या दिवशी शुद्धोधनाने आपल्या सरदारांची बैठक बसविली व त्यात गौतमाने केलेल्या निश्चयाची बातमी त्यांस दिली. हे कळल्याबरोबर सरदार म्हणाले, "आम्ही त्याच्यावरती पहारा ठेवू. तो आपल्या हातांतून कसा जाईल ? हे आम्ही पाहू," अर्थात अशा कडेकोट बंदोबस्तात निघून जाणेच शक्य नव्हते म्हणून त्याने तो दिवस तसाच जाऊ दिला. मध्य रात्री तो जागा झाला व त्याचा घोडेवाला चंडक यास झोपेतून उठवले व त्यास, “मला जावयाचे आहे, माझ्या घोड्यास घेऊनं ये” असे सांगितले. den, त्यास प्रथमतः कबूल होईना व गौतमास जाऊ नको म्हणून गळ घालू लागला. परंतु गौतमाचा निश्चय अढळ आहे असे दिसल्यावर त्याचा घोडा कंथक यास तो घेऊन आला. गौतमाने त्याची बायको व मूल ज्या खोलीत झोपली होती त्याचे दार हळूच उघडून त्यांच्यावर शेवटची नजर टाकून कंथकावर स्वार होऊन त्या रात्री तो कपिलवस्तु सोडून गेला.