बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व - Page 372

330 डॉ, ढाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

गृहत्याग केल्यानंतर गौतमाने दोघा गुरूंचे शिष्यत्व पत्करून जगात दुःख का ? या प्रश्नाचे उत्तर मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रथम आराद कलाम द त्यानंतर उट्रक रामपुत्र यांचे शिष्यत्व त्याने पत्करले, अशा परी सात वर्ष त्टांच्या सान्निध्णत त्याने घालविली. परंतु त्यांच्या उपदेशांपासून त्याचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांना सोडून तो मगध देशात उरूवेल (ज्याला हल्ली बुद्धया असे म्हणतात) त्या ठिकाणी येऊन राहिला. त्या ठिकाणी त्याच्यासारखेच संसाराला सोडून आलेले पांच संन्यासी अरण्यवास पत्करून बसले होते. त्यांच्याबरोबर गौतमाने देहदंडन व खडतर तपश्चर्या करण्यास सुरटात केली. सहा वर्षाच्या देहदंडनाने त्याचे शरीर अत्यत कुश झाले व त्याल' चालण्याची शक्तीदेखील राहिली नाही. एके दिवशी जवळून वाहत असलेल्या फाल्गू नदीतून स्नान करून परत आपल्या आश्रमात येत असताना तो वाटेत घेरी येऊन पडला. जवळच एक धनगर रहात होता. त्याची वडील मुलगी सुजाता हिने गौतमास .त्या स्थितीत पाहिले व त्याला घरून दूधभात आणून दिला. शुद्धीवर आल्यानंतर त्याला वाटू लागले की, देहदंडनाप'सून, जगात दुःख कां याचे ज्ञात होणे शक्य नाही. गौतमाने अन्न सेवन केले यामुळे तो योगश्रष्ट झाला अशी कल्पना करून घेऊन त्याचे पांच सोबती त्यास सोडून गेले व त्या gente बुद्ध एकटा राहिला,

एके US एका वृक्षाच्याखाली गौतम बसला असताना यग जगात दुःख का द ते दुःख नाहिसे करण्याचा मार्ग कोणता. या प्रश्नाचा त्याला उलगडा झाला. त्याला दिसले की, मानवी जीवनक्रमाचे दोन प्रचलित मार्गाने लोक चालले आहेत. एक चैन करून कालक्रमणा करणे हा, दुसरा देहदंडन करून मरण्याचीं अपेक्षा करीत राहणे हा. हे दोन्ही मार्ग चुकीचे अहेत. या दोन्ही मार्गानी संसारातील मानवाचे दुःख हरण होणे शक्य नाही, अशी दिव्य दृष्टी त्या रात्री त्या वृक्षाखाली बसला असताना गौतमाला झाली. या दिव्य दृष्टीने गौतम ज्ञानी झाला म्हणून लोक त्याला बुद्ध (ज्ञानी) म्हणू लागले आणि ज्या वृक्षाखाली त्याला ज्ञान झाले त्या वृक्षाला बोधीवृक्ष असे जगप्रसिद्ध नाव प्राप्त झाले.

या नवीन दिव्य दृष्टीचा असा परिणाम झाला की, बुद्धाने देहदंडन सोडून दिले. तो संसारात पुन्हा पडला नाही. पण तो पुन्हा समाजात आला व समाजाच्या उद्धारार्थ त्याने धर्मसंस्थापनेचे कार्य आरंभिले. सर्व हिंदुस्थान पायाखाली घालून आबालवृद्धास, स्त्रीपुरूषांस आपला धर्म त्याने स्वमुखाने सांगितला. हे कार्य त्याने तब्बल चाळीस वर्षे केले. अखेर धर्मप्रचाराकरिता