बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व - Page 373

बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व ३३१

फिरत असताना बुद्ध पावा येथे मुक्कामास राहिला. त्या गावी चुडा नावाचा एक लोहार रहात असे. त्याने बुद्धास आपल्या घरी जेवण्याकरिता येण्याचा आग्रह केला. चूडा यांच्या घरचे ते अन्न त्याला जाचले व तो आजारी झाला. तशाच आजारीस्थितीत बुद्ध नेपाळच्या पूर्व भागी असलेल्या कुशीनारा गांवी गेला व त्या ठिकाणी त्याचा अंत झाला.

बुद्ध येशू खिस्ताच्या पूर्वी ५६३ व्या वर्षी राजपुत्र म्हणून जन्मास आला व खि. पू. ४८३ व्या वर्षी धर्मसंस्थापक म्हणून मरण पावला.

बुद्धाचे कार्य

बुद्धाच्या धर्माची मूल तत्त्वे काय ? त्याने कोणते कार्य साधले याचे आकलन झाल्याखेरीज बुद्धाचे महत्त्व कळून येणार नाही. या प्रश्नांचा सविस्तर खुलासा स्थळ संकोचामुळे या ठिकाणी करता येणे शक्य नाही; परंतु थोडक्यात बुद्धाच्या कार्याची कल्पना करून देता येणार नाही, असे मात्र म्हणता येणार नाही. बुद्धकालीन ब्राह्मणी धर्माचे तीन आधारस्तंभ होते. वेदप्रामाण्य हा पहिला आधारस्तंभ, यज्ञ बलिदान हा दुसरा आणि वर्णाश्रम हा तिसरा. वेदांत असेल ते सारे खरे, सत्य बुद्धील' ण्टो अगर न पटो. वेदांत असेल ते सारे खरे, हा जो ब्राह्मणी धर्माला आधारस्तंभ वाटत असे, त्याला बुद्ध मनुष्याच्या ज्ञान मागलिला पहिला धोंडा असे मानीत होते. वेदांत असेल ते खरे, या ब्राह्मणी धर्माच्या तत्त्वाच्याविरूद्ध ज्ञानाला पटेल तेच खरे असे, बुद्धाचे तत्व होते. ब्राह्मणी धर्मात परमेश्वरप्राप्ती हाच धर्माचा हेतू असे मानले जात असे. परमेश्वराला बलिदान दिल्याखेरीज त्याची प्राप्ती होऊ शकत नाही, म्हणून यज्ञ करणे व त्यात बळी देणे हाच खरा धर्म मानला जात असें. अगदी पूर्वी ब्राह्मणी धर्मात मुनष्याचा बळी यज्ञात देत असत व त्या नरबळीचे मांस यंजमानास खावे लागत असे. नरबळीची चाल जरी बुद्धाच्याकाळी बंद पडली होती तरी यज्ञांत पशूचा बळी देण्याची चाल जारी होती. त्याकाळचे वाडमय ज्यांनी वाचले असेल त्यांना आजच्या ब्राह्मणांचे पूर्वज असंख्य गाईचा यज्ञाकरिता कसा संहार करीत असत हे माहीत असेलच. हे वाङमय वाचून जेवढ्या गाई ब्राह्मणांनी यज्ञात कापल्या असतील त्याच्या शतांशांने मुसलमानांनी कापल्या असतील काय, याबद्दल संशय उत्पन्न होतो. जसा वेदप्रामाण्यावर बुद्धाने हल्ला चढविला, तसा त्याने यज्ञावरती हल्ला चढविला. बुद्धाची या बाबतीतील भूमिका अत्यंत क्रांतीकारक होती, असेच म्हटले पाहिजे. धर्माचा आणि परमेश्वर प्राप्तीचा कांही संबंध नाही, असा बुद्धाचा पक्ष होता. मनुष्याने मनुष्याशी कसे वागावे ह्याचे योग्य प्रकारचे