बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व 333
आश्रयाने प्रसार पावलेले नाहीत. मुसलमानी धर्म तलवारीच्या जोरावर वाढला. ख्रिस्ती धर्म कायद्याच्या जोरावर वाढला. फक्त एकट्या बुद्धाच्या धर्माचा प्रसार गुणांमुळे झाला. त्याला तलवारीच्या धारेची अगर कायद्याच्या दंडनाची जरूरी लागली नाही, लोकांन" धरून आणून बुद्धाच्या धर्माची दीक्षा देण्याचे कारण पडले नाही. लोकांनी आपण होऊन त्यात उडी घेतली.
असे असतान बुद्धाच्या नावाची विस्मृति लोकांना. कशी झाली अरा प्रश्न उपस्थित होतो. हिंदुस्थानाबाहेर बौद्ध धर्म अजून जिवंत आहे. त्याची संख्यः काही कमी नाही. हिंदुस्थानातून त्याचे उच्चाटन झाले. त्याची कारणे आज येथे स्थलसंकोचामुळे देता येत नाहीत. परंतु त्याचे थोडक्यात दिग्दर्शन करणे अवश्य आहे. बुद्धाच्या नावाची विस्मृति कालाला. शक्य नाही. बुद्ध अजरामर, अमर आणि अकाल आहे. त्याच्या नावाचा लोप काल कसा करू शकेल ? बुद्धाची विस्मृति चीनमध्ये झाली नाही, जपानमध्ये झाली नाही, ब्रह्मदेशात झाली नाही, फक्त हिंदुस्थानातच झाली. याला काल कारण नसून बुद्धाचे शत्रू कारणीभूत आहे हे उघड आहे. ब्राह्मण हे एकजात बुद्धाचे शत्रू, ब्राह्मणांचे भांडण काही बुद्धांशीच होते असे नाही. त्यांचे जैन धर्माचा संस्थापक महाठीर यांच्याशीही भांडण होते. बुद्धाप्रमाणे महावीर हाही यज्ञाच्या विरूद्ध होता. पण ब्राह्मणांनी जसा बुद्धांवर निष्दूरणणाचा व निकराचा हल्ला केला तसा महावीराठर केला नाही. याचे कारण बुद्ध जसा चातुर्वर्ण्याच्या विरूद्ध होता तस! महावीर नव्हता. बुद्धाच्या वेदनिंदेबद्दल ब्राह्मणांना जरी विषाद दाटत असे तरी त्यांना त्याची विशेष चीड नसे. वेदाचे प्रामाण्य गेले तरी त्यात
ब्राह्मणांचे मोठेसे नुकसान नाही. . तसेच काहीसे यज्ञसंबंधाने त्यांना वाटे. यज्ञ राहिला तरी ठीक, गेला तर त्यात काही मोठी आपत्ती ओढवणार नाही, असे त्यांना वाटे. पण चातुर्वर्ण्यासंबंधी मात्र त्यांची मनोदिशा निराळ्या प्रकारची होती. चातुर्वर्ण्य गेले तर ब्राह्मण गेले, हे त्यांनी ओळखले होते. अर्थात चातुर्दण्याला ते आपला प्राण समजत. बुद्धाची चातुर्वर्ण्य विध्वंसनाची मोहीम म्हणजे ब्राह्मणांना ' मुले कुठारः ' असे वाटणे साहजिक आहे. ती त्या काळची ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ होती असे म्हणावयास काहीच हरकत नाही व त्या चळवळीचा अधिष्ठाता जो बुद्ध, त्याला ते मांग अथवा कालपुरुष लेखीत असत. त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांनी होते नव्हते तितके सर्व उपाय केले. आपले वैदिक देव ब्रह्मा, विष्णु, महेश यांना बाजूस सारून क्षत्रिय राजांना देव करून बुद्धाची चळवळ त्यांनी मारली. क्षत्रिय रामाला, ब्राह्मण आज जसे जेध्यांना भजतात तसे भजू लागले. एकट्या रामाला हाताशी धरून कार्य होत
तय पड +8