बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व - Page 376

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३३४

एका क्षत्रिय राजाला-कृष्णाला पुढे करून ब्राह्मणांनी नाही असे दिसताच दुसऱ्या

राजांना भजू लागले, आता ब्राह्मणांच्या त्याला देव बनविला. ब्राह्मण आपल्याच

उत्पन्न करून, विरूद्ध मोहीम चालू ठेवण्यास कारण नाही अशी वृत्ति ब्राह्मणेतरांत बुद्धाने आरंमिलेल्या ब्राह्मणेतर चळवळीची धार ब्राह्मणांनी काढून टाकली व तिला बोथट केली. बुद्ध तुमचा खरा, पण आम्ही देखील त्याला आमच्या विष्णुचा दहावा अवतार मानतो, असे ब्राह्मण म्हणू लागले. जनता खूष झाली. आमच्या बुद्धाला ब्राह्मणांनी दहावा अवतार मानला. झाले ! आता ब्राह्मणांशी भांडावयाचे कारण काय ? एकीकडून ब्राह्मणेतर जनतेशी सामदाम केला. दुसरीकडून बुद्धाचे अनुकरण करून आणि ब्राह्मण धर्म व बुद्ध धर्म एकच अशी लोकांची दिशाभूल करण्यास ब्राह्मणांनी सुरवात केली. बुद्धाने विहारे बांधली. विहारे ही बुद्ध धर्माची लोकांच्या दृष्टीने जागती ज्योत खूण. बुद्धाच्या विहारांच्या शेजारीच ब्राह्मणांनी आपली विहारे बांधण्यास सुरवात केली. या बाह्यत्कारी साम्यांमुळे लोकांच्या मनातून बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म या दोहोमधील फरक दिसेनासा होऊन धर्माच्या बाबतीत पृथकपणा जाऊन सबगोलंकार झाला. शेवटी मुसलमानांच्या स्वाऱ्यांनी बुद्ध विहारांचा विध्वंस केल्यानंतर जेव्हा बुद्ध भिक्षू देश सोडून गेले तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा समूळ लोप करण्याच्या उद्देशाने बुद्ध विहारांना पांडव लेणी म्हणू लागले व बुद्धाच्या मूर्ति फोडून

त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करू लागले. |

ब्राह्मणांनी बुद्धाचे नाव या देशातून धुवून काढण्याचा प्रयत्न करावा हे समजण्यासारखे

आहे. तो त्यांचा बोलूनचालून शत्रूच होता. त्याची जयंती करावी असा विचार त्यांना

कसा रुचेल ? परंतु ज्या ब्राह्मणेतरांच्या हिताकरिता त्यांना अंधश्रद्धेच्या तावडीतून सोडविण्याकरिता, जंतर मंतरच्या खोट्या धर्माच्या कचाट्यातून मोकळे करून खऱ्या

मानवी धर्माच्या मार्गावर आणण्याकरिता, त्यांची माणुसकी प्रस्थापित करण्याकरिता, त्यांचा स्वाभिमानदीप प्रज्वलित ठेवण्याकरिता जो झटला, ज्याने ब्राह्मणेतर जनतेच्या हिताकरिता राज्यवैभवाचा त्याग केला, ज्याने आपल्या कीर्तीने देशाचा लौकिक वाढविला अशा

महापुरुषाला ब्राह्मणेतरांनी समूळ विसरून जावे, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी

तरी बुद्धाची स्मृति जिवंत ठेवणे अवश्य होते.

बुद्ध जयंती साजरी करा असे हिंदुमात्रास सांगावयास आम्हाला हे एकच कारण आहे असे कोणी समजू नये. आमचे मुख्य कारण यापेक्षा भिन्न असून सबळ आहे असे आम्हास वाटते. हिंदूंतील सुशिक्षित लोकांना राजकारणात हिंदु संस्कृतीच्या पायावर व हिंदूकरता लोकशाही प्रस्थापित करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे व त्या प्रीत्यर्थ त्यांचे सारे प्रयत्न

चाल आहेत. असल्या हिंदु लोकांच्या बुद्धीची आम्हांस कीवच येते. या देशात