बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व ३३५
लोकशाही प्रस्थापित करू असे म्हणणारे लोक एक तर मूर्ख तरी असले पाहिजेत किंवा लबाड तरी असले पाहिजेत. परंतु ही लबाडी व हा मूर्खपणा फार दिवस चालणार नाही. अनुभवाची गाठ पडल्यानंतर असे दिसून येईल की, ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही ह्या परस्पराविरोधी, एकमेकांस विरोधी गोष्टी आहेत. लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण्य नाहीसे झाले पाहिजे. हे चातुर्वर्ण्यांचे जंतु काढून टाकण्याकरिता बुद्धाच्या तत्त्वज्ञाना- सारखे मारक रसायन नाही, असे आम्हांस वाटत. म्हणून आम्ही म्हणतो की, राजकारणाची रक्तशुद्धी करण्याकरिता बुद्धजयंती सर्व हिंदूंनी साजरी करणे हितावह व आवश्यक आहे. |
हिंदुस्थान देश आज राजकीय दृष्ट्या रोगी माणसासारखा आहे. हिंदुस्थानची आठवण झाली म्हणजे पोट वाढलेले, हातापायांच्या काट्याकुट्या झालेल्या, चेहरा फिकट झालेला, डोळे आत गेलेले, हाडांचा सांगाडा झालेल्या पुरुषाचे चित्र नजरेसमोर उभे रहाते. याला लोकशाहीचा गाडा चालविण्याची ताकद नाही, पण लोकशाहीचा गाडा घेऊन चालविण्याची मोठी हौस. हौस पुरवायची तर त्याला ताकद आवश्यक आहे. ती औषध घेतल्याशिवाय प्राप्त होणे शक्य नाही, पण औषध घेऊन काय उपयोग ? सर्वांना माहित आहे की, कोणतेही औषध घेण्यापूर्वी कोठा साफ करावा लागतो. त्यातील मळ काढावा लागतो. त्याशिवाय औषधाचा गुण येत नाही. आमच्या हिंदुमात्राचा कोठा शुद्ध नाही. त्यात ब्राह्मणी धर्माचा कैक दिवसांचा मळ घर करून बसला [आहे. ] जो dg हा मळ धुवून काढील तोच या देशाला लोकशाहीच्या प्रस्थापनेत मदत [करू ] [शकेल. ] [तो ] [वैद्य ] म्हणजे गौतम बुद्ध हाच एक आहे. हिंदूंची रक्तशुद्धी रामाची जयंति करून होणार नाही, कृष्णाची जयंति करून होणार नाही किंवा गांधीची जयंति करून होणार नाही. राम, कृष्ण, गांधी हे ब्राह्मणी धर्माचे उपासक आहेत. लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला त्यांचा काही उपयोग नाही. उपयोग झाला तर एका बुद्धाचाच होऊ शकेल त्याची आठवण घेणे आणि त्याचीच मात्रा घेणे हाच एक हिंदुमात्राच्या राजकीय व सामाजिक रक्तशुद्धीचा उपाय आहे, असे आम्हास निःसंशय वाटते, म्हणजे
बुद्धम् सरणम् गच्छामि |
धम्मम् सरणम् गच्छामि |
संघम् सरणम् गच्छामि ||| "`
हा महामंत्र त्यांनी जपावा असे आमचे सांगणे आहे. “
छ छे ©
जनता, ता. १७ मे १९४१.