दंगा झाला ! दंगा झाला ! काय उपाय नाही त्याला ! - Page 379

दंगा झाला ! दंगा झाला ! काय उपाय नाही त्याला ! ३३७

हा दंगा राजकीय आहे, असे आम्हास पूर्वीपासूनच वाटत होते. आणि मद्रास येथे मुस्लिम लीगचे भरलेले अधिठेशन संपल्याबरोबर ही दंग्याची साथ सर्वत्र झाली, एवढ्यावरती आम्ही आपला तर्क बांधलेला होता. परंतु आतः तर्क करण्याची आवश्यकता उरलेली नाही. उभय पक्षांनी या बाबतीत कदुलीजबाब दिलेला आहे. दंग्याच्या बाबतीत हिंदू महासभेचे पुढारी बॅ. सावरकर यांनी जे पत्रक काढले होते त्यात त्यांनी असे स्पष्ट म्हटले होते की हा दंगा, दंगा नसून मुसलमानांचे हिंदूविरूद्ध एक बंड आहे. मुसलमानांचे पुढारी बॅ. जिना यांनीही एक पत्रक कादून असा खुलासा केला आहे की मुंबईतील दंगा हा धार्मिक स्वरुपाचा नसून र'जकीय स्वरुपाचा आहे. हिंदूपासून राजकीय सत्ता हस्तगत करून घेण्याचा या दंग्याचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत मुंबईचे सरकारी अधिकारी हा दंगा गुंड लोकांनी केला आहे, असे मानून आपली उपाययोजना करीत होते. त्यांनाही आपली दिशाभूल झाल्याचे पटले असावे, असे दिसते. कारणः आजच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या लिखाणावरून तरी दंग्याचे उत्पादक गुंड लोक नसून दंग्याच्या मुळाशी व्यूह रचणारे पाताळयंत्री लोक आहेत, हे मान्य करणे भाग झाले आहे. अशा दंग्याला उपाय काय ? हा प्रश्‍न जो तो विचारील, यात काही आश्चर्य नाही. हा दंगा बंद व्हावा अशी पुढाऱ्यांची तरी इच्छा दिसत नाही, मि. जिना यांनी हा राजकीय दंगा आहे एवढेच काय ते व्यक्तव्य केले, परंतु आपल्या मुसलमान बंधूना व अनुयायाना तुम्ही दंगा करू नका, असे सांगितले नाही. बॅ. सावरकर, तुम्ही मुसलमानांना दंगा थांबविण्यास सांगा मग आम्ही हिंदुलोकास दंगा थांबविण्यास सांगू, असा वाद, बाबू राजेन्द्रप्रसाद यांच्याशी घालीत बसले आहेत. गांधीनी तर विचित्र प्रकारच केला आहे. त्यांनी जे पत्रक काढले त्या पत्रकामुळे दंगा थांबविण्याऐवजी तो बराचसा चिघळला, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. अहमदाबादच्या हिंदूंवरती झालेल्या अहिंसेच्या घोर परिणामाने विव्हल झालेल्या गांधींना दंगा संपल्यानंतर हिंसाहिंसेसंबंधाने आपले नवे व सुधारलेले विचारं काढता आले असते. दंगा चालू असतांना ते काढल्यामुळे मोठा . नाश झाला. असे म्हणावयास काहीच हरकत नाही. कारण गांधीचे पत्रक हिंदूलोकांना मुसलमान गुंडाच्या विरूद्ध तुम्ही हिंसा करा आणि आपला बचाव करा, असे प्रोत्साहन देण्यापालिकडे दुसरे काहीच नव्हते, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. ' गुंड अंगावर आला तर पळून जाऊ नका ' एवढेच जरी गांधीनी सांगितले असले तरी त्यात पळून जाऊ नका आणि मारा, अशी गर्भित नव्हे, उघड सूचना आहे, असा समज सर्वांचा झाला आहे. निदान मुसलमानांचा तरी तसा समज झाला आहे, यात वाद नाही. आणि गांधीचे पत्रक निघाल्यानंतर थांबलेला दंगा पुन्हा सुरू झाला, हा त्याचा पुरावा आहे. पुढाऱ्यांना दंगा थांबविण्याची