33¢ डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
इच्छा दिसत नाही. तसेच दंगा थांबविण्याकरिता ज्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत त्यांच्या हातून दंगा थांबविला जाईल, असे वाटत नाही. या समित्यापैकी जिला PEACE कमिटी म्हणून म्हटले जाते त्या समितीने दंग्याला कोणी सुरवात केली हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केलेला दिसतो. दंग्याची जबाबदारी कमिटीचे मुसलमान सभासद हिंदूवरती लादू इच्छितात आणि हिंदू सभासद त्याची जबाबदारी मुसालमानांवरती लादू इच्छितात. दंग्याची मूळ जबाबदारी कोणावरती हे तपासून पाहिल्याशिवाय दंगा थांबविता येणे शक्य नाही, अशा विचाराने समितीचे सभासद भारले गेले असल्याकारणाने या समितीच्या हातून दंगा शमविण्याच्या बाबतीत यश होईल अशी आशा करण्याला फारच थोडी जागा आहे. या PEACE कमिटीशिवाय दंग्यात सापडलेल्या लोकांना मदत करण्यात एक रिलीफ कमिटी हिंदूनी प्रस्थापित केलेली असून दंग्यात सापडलेल्या हिंदू लोकांना मदत करण्याकरिता ती स्थापलेली आहे. दुसरी मुसलमान लोकांना मदत करण्याकरिता स्थापलेली आहे. या कमिट्या दंगा शमविण्याच्या दृष्टीने निरुपयोगी आहेत. इतकेच नव्हे तर त्यामुळे दंगा जास्त दिवस चालू राहण्याचा संभव आहे, असे वाटते. दोन राष्ट्रांमध्ये लढाई सुरू झाली असतांना ती टिकविणे व तिच्यात यश मिळविणे ही गोष्ट सर्वस्वी supply डिपार्टमेंट याच्यावरती अवलंबून असते. म्हणून लढाईमध्ये लढाईतील हरेक पक्ष आपल्या सैनिकाच्या पाठी एक मोठे Supply डिपार्टमेंट प्रस्थापित करीत असतो. या रिलीफ कमिट्या आमच्या दृष्टीने Supply डिपार्टमेन्टस् आहेत. हिंदूंनी मुसलमानांच्या मदतीकरिता व मुसलमानांनी हिंदूंच्या मदतीकरिता आता रिलीफ कमिट्या प्रस्थापित केल्या असत्या तर त्यांच्या हातून दंगा शमविण्याचे कार्य पुष्कळ अंशी यशस्वी झाले असते, असे आम्हास वाटते. पंरतु त्याचे हल्लीचे स्वरुप व त्यांचे ज्ञातिवाचक ध्येय ध्यानात घेतले तर त्यांचा दंगा टिकवून ठेवण्यासच जास्त उपयोग होईल असे म्हणावयास हरकत दिसत नाही. या दृष्टीने पहाता हे ग्रहण सुटणार कसे ? हा एक मोठाच बिकट प्रश्न होऊन बसला आहे. दंगा राजकीय आहे या बाबतीत सर्वाचेच एकमत झालेले आहे. अर्थात हिंदू मुसलमानांचा राजकीय प्रश्न सुटल्याखेरीज हे ग्रहण सुटणे शक्य दिसत नाही. “दै दान सुटे गिराण ' अशी मुसलमान लोकांची वृत्ती झाल्याचे दिसून येते, काही तरी दान दिल्याखेरीज हे ग्रहण सुटेल असे दिसत नाही. तसल्या प्रॅकारचे दान दिले असता हा राहू संतुष्ट होईल याच्याबद्दल विशेष कोणाला काही शंका उरली आहे, असे म्हणता यावयाचे नाही. पाकिस्तान द्या किंवा सर्व ठिकाणी अर्धा भाग द्या, अशी मुसलमानांची मागणी आहे, हे आता सर्वांना माहीत आहे. प्रश्न एवढाच आहे की कोणते दान द्यावयास हिंदूलोक