दंगा झाला ! दंगा झाला ! काय उपाय नाही त्याला ! ३३९
तयार होतील ? आतापर्यंतच्या हिंदूलोकांच्या धोरणावरून असे स्पष्ट दिसते की, या दोहोतून एकही गोष्ट मान्य करण्यास हिंदू लोकांची तयारी नाही. पाकिस्तान मान्य करण्यास हिंदूलोकांची तयारी नाही. पाकिस्तान मान्य करावयाचे नाही, असे त्यांनी ठरविल्याचे दिसते. आणि कम्युनल अवॉर्डपेक्षा सुईच्या अग्रावर जेवढी माती राहते तितकीदेखील जास्त सवलत मुसलमानांना द्यावयाची नाही, हा तर त्यांचा कृतनिश्चय आहे. या दृष्टीने पाहिले असतांना हिंदुस्थानचे भविष्य निराशामय आहे, हे कोणी सांगू शकेल. दान न देता ग्रहण सोडविण्याचे दोन मार्ग हिंदू लोकांनी ठरविल्याचे हिंदू लोकांच्या अनुमानाने दिसते. त्यात काँग्रेस व हिंदू महासभा यांचे मार्ग अगदी भिन्न दिसतात. इंग्रज सरकारला आपल्या चळवळीच्या जोरावर जेरीस आणूम त्यांच्या हातून मुसलमानांना शह द्यावयाचा, ही काँग्रेसची लढाईची नीति असावी, असे दिसून येते. हिंदू महासभेचा मार्ग निराळा दिसतो. मुसलमानाशी चौथी पानपत करून त्यांना जाग्यावर बसवावयाचे, हे हिंदू महासभेचे धोरण दिसते. या दोहोंपैकी एकाच्याही मार्गाने यश येईल, असे आम्हास वाटत नाही. बेडकी फुगली तरी ती बैलाएवढी होत नाही. कॉँग्रेसची चळवळ कितीही फोफावली व कितीही जोरकस झाली तरी इंग्रज सरकारला ती नमवू शकेल इतकी तेजस्वी व बलवान होईल, असे फक्त काँग्रेसचे लोकच म्हणू शकतील. काँग्रेसची राजकीय शक्ती किती मोठी आहे, याची कल्पना करून घेण्याकरिता फार दूर जावयास नको. नुकतेच घडलेले आयर्लडचे उदाहरण ' याला पुरेसे आहे. आयर्लडच्याच उत्तर विभागात सरकारने सक्तीने लष्कर- भरतीचे धोरण अमलात आणण्याचा आपला निश्चय जाहीर केला होता. आयर्लंडच्या उत्तर विभागाचा व दक्षिण विभागाचा आज काही संबंध नाही. राजकीय दृष्ट्या हे विभाग अगदी तुटक आहेत. मि. डी. व्हॅलेरा यांची आयर्लंडच्या उत्तर विभागावर कसल्याहीप्रकारची सत्ता नाही. असे असतांना मि. व्हॅलेरा यांनी ब्रिटिश सरकारच्या सक्तीच्या लष्कर-भरतीच्या धोरणाचा एकदाच एकच भाषण करून निषेध केला. त्याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकारला आपले सक्तीचे लष्कर-भरतीचे धोरण मागे घ्यावे लागले. काँग्रेस लढाई सुरू झाल्यापासून आज दोन वर्षे सतत आपली राजकीय घोषणा इंग्रज सरकारपुढे मांडीत आहे. परंतु त्याकडे ब्रिटिश सरकारने डोळासुद्धा उघडून पाहिला नाही. यादृष्टीने पाहिले असता ' कहा डि. व्हॅलेरा, कहा गांधी; कहा राजा, कहा पोतराज; कहा राजभोज, कहा गंगा तेली, असे म्हणण्याची पाळी येते. याबद्दल आम्हास खेद वाटतो. परंतु इंग्रजांना जरब लावून मुसलमान लोकांनी केलेल्या पाकिस्थानच्या उठावणीला शह देण्याइतकी शक्ती कॉँग्रेसच्या चळवळीतूनच निपजेल असे मानणे अत्यंत धाडसाचे होईल, असे म्हणावयास