३४० डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
आम्हास तरी हरकत दिसत नाही. हिंदू महासभेच्या धोरणाकडे पाहता तिचाही मार्ग यशस्वी होईल, असे आम्हास दिसत [नाही. ] हिंदू, महासभा म्हणजे एक खोका आणि त्यावर बॅ. सावरकर यांचे नाव याच्यापेक्षा हिंदू महासभेत विशेष काही शक्ती आहे, असे दिसत नाही. हिंदू महासभेचे जे वातावरण आज पसरलेले दिसते ते कायम टिकेल असे म्हणता [यावयाचे ] [नाही. ] हिंदू महासभेचे वातावरण हे एक आकाशातील ढगाप्रमाणे आहे. हे ढग दोन ठिकाणी येऊ शकतात. ज्याठिकाणी हिंदू-मुसलमानांची तेढ आहे त्याठिकाणी महासभेचे ढग दिसतात. ज्याठिकाणी ब्राह्मणी धर्माचा जोर अजून गेलेला [नाही ] [त्याठिकाणी ] हे ढग आलेले दिसतात. मद्रास प्रांतात हिंदू महासभेचे ढग केवळ [ब्राह्मणी ] धर्माच्या वाफा आहेत. बंगालमध्ये हिंदू महासभेचा जोर हिंदू-मुसलमानांच्या दंग्यामुळे आहे. अन्य ठिकाणी हिंदू महासभेचे रोप जीव धरू शकत [नाही. ] हे सर्व अन्य प्रांतातील स्थानिक परिस्थितीं जो [चोखाळून ] [पाहील ] [त्यास ] [दिसून ]
येईल.
वरील कारणामुळे हिंदू महासभेचे रोप जीव धरून त्याचा मोठा वृक्ष होईल, त्या वृक्षाखाली बसून सर्व हिंदूना आपला कॅम्प करून मुसलमानावरती हल्ला करून त्याचा पराभव करता येईल, ही आशा विफल ठरल्याशिवाय राहणार नाही. दंगा हे एक राजकीय ग्रहण आहे. दान दिल्याशिवाय ते सुटत नाही. दान देण्यास हिंदू तयार नाहीत. आणि दान मागणाऱ्या मांगाना ते जरब लावू शकत नाही. अशा या पेचप्रसंगात हा देश सापडला आहे. याबद्दल आम्हाला फार खेद होतो. हा दंगा थांबविणे मानवाच्या हातात आहे, असे तूर्त तरी दिसत नाही. बंद झाला तर वरुणाच्या ळृपेने होईल असे वाटते. म्हणून--
येरे येरे पावसा |
तुला देइन पैसा ||
अशी प्रार्थना मुलांनीच नव्हे, तर सर्व अबालवृद्धांनी करावी, अशी आमची [त्यांना ] सूचना आहे.
अग्रलेख : जनता, ता. ७ जून १९४१.
उद्धृत, WA, खंड ५ पृ. ३२-३६.