+
३४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
या शब्दसमुच्चयाने संबोधिले आहे, त्याबद्दल मी आपला फारच ऋणी आहे. महार लोक नेहमीच ' परमपूज्य ' हे विशेषण लावून मला संबोधितात. पण त्यात विशेष असे काही नाही. महारांनी महाराची स्तुति केली, याला काय किंमत ? आपण मांग आणि मी महार असूनही आपण मला ' परमपूज्य बाबासाहेब ' म्हणालात यातले प्रेम आणि त्याचे स्वारस्य काही और आहे, इतके
की, ते सांगता नये.
माझ्या पत्राचे उत्तर न दिल्यामुळे मी गांधींचा तिरस्कार करतो, हा आपला गैरसमज कोणी करून दिला, ते मला समजत नाही, गांधीचा मी तिरस्कार करीत असलो. तरी त्याची कारणे दुसरी आहेत. माझ्या पत्नाला त्यांनी उत्तर दिले नाही हे नव्हे. मला आपल्याप्रमाणे अनेक लोक पत्र लिहितात. पण त्यांना कधी उत्तर देण्याचा क्राम मी ठेवलेला नाही. याबद्दल पुष्कळ लोकांस वाईट वाटते, पण ते त्यामुळे माझा तिरस्कार करीत नाहीत. त्यांना ठाऊक आहे की, मी रात्रंदिवस कामात असतो. मला छानशौक, ऐषआराम माहीत नाहीत, नाटक, सिनेमात मी वेळ धालवीत नाही. माझा धंदा, वाचन किंवा सार्वजनिक कार्य या व्यवसायात मी सतत गुंतलो आहे. मला गांधीसारखे सेक्रेटरी नाहीत. माझे 'काम मलाच करावे लागते. हे जाणूनच पत्र लिहिणारे माझे मित्र, माझे सहकारी मला क्षमा करतात; माझा तिरस्कार करीत नाहीत. ' उत्तर न दिल्यास मी तुमचा तिरस्कार करीन ' असे आपण जे म्हटले आहे, ते मनुष्य स्वभावास धरूनच आहे. आपली योग्यता काय आहे, है मला माहित नाही, ' मी निजाम इलांख्यामंधीले मराठवाडा विभागातील मातंग समाजातील शिकलेला, सर्वात पहिला विद्यार्थी आहे, ' असे आपले वर्णन आपण केले आहे. तिरस्कार करण्याची पाळी यावी हे वाईटच पण आपण केवळ विद्यार्थीच असता तर आपल्या तिरस्काराची फारशी मातब्बरी वाटली नसती. पण आपण बजावले आहे की, ' मातंग समाजाच्या सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे. ' मी आपणास सामान्य विद्यार्थी या नात्याने पत्र पाठवीत नसून निजाम स्टेटच्या मातंग समाजाचा भावी पुढारी म्हणून पत्र पाठवीत आहे. म्हणून आपण उत्तर देण्यास अनमान करू नये. ज्यू लोकांमध्ये जसा मोझेस तसे मातंग समाजात आपण आहात. हे आपल्या भाषेवरून उघड आहे. आपल्या पत्राला कोण उत्तर देणार नाही ! आपल्या मनात माझ्याविषयी तिरस्कार उत्पन्न झाला, तर सर्व मातंग समाज माझा तिरस्कार करू लागेल. तो टाळला नाही तर तो माझ्या अर्नथाला कारणीभूत होणारा नाही, असे कोण म्हणेल ? मला तरी म्हणता येणार नाही, तो टाळण्याकरिता माझा शिरस्ता मोडून मी आपल्या पत्राचे
उत्तर देत आहे.