एका मातंग गृहस्थाच्या पत्रास उत्तर ३४३
पहिल्या प्रथम दोन गोष्टीबद्दल आपले आभार मानल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. महार लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही असा समज करून घेतात, यावर
आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे
अनुकरण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे, तो आपण कृतीत आणावा, अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. मी समतेचा मोठा भोक्ता, नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही, असे सांगून थकलो, पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही, आपण मांग लोकांना माझ्या फोटोची पूजा करू देणार नाही, हे तर चांगलेच आहे. . मांग लोकांची अवस, पुनव, ग्रहण मानण्यापेक्षा माझ्या फोटोचे पूजन करणे वाईट आहे, याबद्दल मला काही संदेह नाही. आपण आपली दृष्टी संकुचित केली आहे. याबद्दल मला वाईट वाटते. . आपण महार लोकांतूनही हे माझ्या पोटोपूजनाचे खूळ नाहीसे करण्याचे ग्रत पत्करले पाहिजे, असे आपल्याला सांगणे मला आवश्यक वाटते. हा आपला मोठाच पराक्रम होईल यात काही शंका नाही. कदाचित एवढा पराक्रम केल्यावर, मातंग समाज आपल्या फोटोची पूजा करू लागेल अशी आपल्याला भीती वाटत असेल, तरी भीती बाळगू नये. आपल्या फोटोची पूजा करण्याची प्रथा माझ्या फोटोची पूजा करण्याच्या प्रथेइतकी कधीच वाईट दुष्परिणामी होणार नाही.
दुसऱ्या एका अभिवचनासाठीही मी आपला आभारी आहे. मी मेल्यावर कसे होईल, अशी चिंता मी अनेक वेळा प्रसिद्ध केली आहे, हे खरे आहे. महारापैकी एकाही तरुणाला मला सांगावयाला हिंमत झाली नाही की, “ काही हरकत नाही, तुम्ही मरा, आम्ही चालवू. “ आपले अभिवचन वाचून आमचे समाधान झाले. द्रोणाने कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविल्यानंतर “ मला गुरुदक्षिणा कोण देईल ?” असा प्रश्न केला. त्याला कोणीच उत्तर देईना. गुरु काय मागतो, कोण जाणे ? प्राण मागतो की काय अशा भयाने सगळेच गप्प बसले. एकट्या अर्जुनाला धैर्य झाले. तो म्हणाला, “ मागा काय मागावयाचे आहे ते, मी देतो. “ द्रोणाच्या ठायी मी व अर्जुनाच्या ठायी आपण आहात असे वाटून माझ्या मागून कोणीतरी आहे, या विश्वासाने मला शांति वाटते, द्रोणाने पण केला होता की, राजा द्रुपदाला शिष्याहाती धरून आणीन म्हणून तसे ब्राह्मण्य नष्ट करणे हा माझा पण आहे. तो माझ्या आयुष्यात माझ्या हातून पुरा होणे शक्य नाही. आपण तो पूरा करण्यास सिद्ध आहात, हे माझे मी मोठे भाग्य समजतो व त्याबद्दल मी आपले आभार मानतो. ही गोष्ट जर आपल्याला करता