एका मातंग गृहस्थाच्या पत्रास उत्तर - Page 386

३४४ डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

आली तर मांग जातीला इतिहासात मोठे स्थ'न प्राप्त होईल. नमनाला फारच तेल गेले आता आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपले आरोप दोन प्रकारचे आहेत. काही माझ्यावर व्यक्तिगत लागू असणा'रे असे आहेत. बाकीचे महार समाजाला लागू असे आहेत.

माझ्यावरच प्रत्यक्ष आरोप काय आहे, हे मला अजूनही समजले नाही. मी फक्त महारांचाच पुढारी आहे, असा मध्यप्रांतातील मांग लोकांनी ठराव रुपाने केलेला माझ्यावरचा आरोप मी वृत्तपत्रांतून वाचला आहे. त्यांतील विधानासंबंधाने मी ता. ४ जानेवारी १९४१ च्या जनतेत लिहिले आहे ते आपण अवश्य वाचून पहावे. मी महारांचाच पुढारी ही काँग्रेसची ओरड, त्याचीच री मांगांनी ओढली. असे किती पोटार्थी मांग-महार आहेत की, जे पैशासाठी वाटेल ते करतील. पुणे करार ' झाला, त्यावेळी काँग्रेस मला ' सर्व हिंदुस्थानातील अस्पृश्यांचा पुढारी ' म्हणून मान्य करीत असे. त्यानंतर मी नुसता मुंबई इलाख्यातील अस्पृश्य लोकाचा पुढारी आहे, असे म्हणू लागली, त्यानंतर नुसत्या महारांचा पुढारी आहे, असे म्हणू लागली. माझी खात्री आहे की, काही दिवसांनी मी कोकणस्थ महारांचाच पुढारी आहे व त्यानंतर मी दापोली तालुक्यातील महारांचा पुढारी, असा प्रचार काँग्रेस करील व त्याला महारांतूनच माणसे सापडतील असे म्हणावयास हरकत नाही. कोणीही काँग्रेसला विरोध करून पहावा, म्हणजे मी म्हेणतो त्याची सत्यता कळेल. चांभारांतील एखादा. पुढारी काँग्रेसला विरोध करायला निघू द्या, म्हणजे हाच मासला दिसून येईल. तो दाभोळ्या जातीचा असला, तर तो चांभार जातीचा पुढारी नसून दाभोळ्या जातीचा पुढारी आहे, असे ते म्हणतील. हरळ्या जातीचा असला तर हरळ्यांचा पुढारी म्हणतील; आणि चेवल्यांच्या जातीचा असला तर चेवल्यांचा पुढारी म्हणतील. मांगामध्ये काही १२ पोटजाती आहेत, असे मला समजते. मांगामध्ये काँग्रेसला विरोध करणारा कोणी पुढारी निघाला तरी त्याची देखील तीच गत होणार. तो ज्या जातीचा, त्या जातीचा पुढारी, असा गिल्ला झाल्याशिवाय रहाणार नाही. ही वस्तुस्थिति मला माहीत असल्यामुळे महारांचा पुढारी म्हटल्याने मला काही नवल वाटत नाही. शिवाय, बाकीच्यांनी माझे पुढारीपण सोडले आणि नुसते महारांनी मानले, तर त्यात काही खेद करण्यासारखे आहे, असे मला वाटत नाही, कोठे तरी कार्य करण्यास संधी असल्यास पुरे. महारांची दुर्दशा काही कमी नाही. नुकत्याच महाराष्ट्र प्रांतिक हरिजन सेवक संघाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टात "' सर्वात महारांची स्थिति अत्यंत हलाखीची आहे '', असे कबूल केले आहे. त्यांची दु:स्थिति नाहीशी करण्याची मला संधी राहिली तरी