एका मातंग गृहस्थाच्या पत्रास उत्तर ३४५
पुरे आहे, असे मानून काम करण्याची माझी तयारी आहे. ' नामके वास्ते आणि
कामके वास्ते ' असे दोन प्रकारचे पुढारी आहेत. मी नामळे वास्ते असलेल्या
पुढान्यातला नाही. मला काम पाहिजे.
मी पुढारी we, मी समाज सेवक नाही. पुढारी या नात्याने चालना देणे,
लोकमत तयार करणे, येवढेच माझे काम आहे, त्यात मी जातीभेदाला जागा दिली,
असे कोणीही-माझा शत्रूदेखील म्हणणार नाही. मी अस्पृश्य जातीतील सर्वांघरी जेवलो आहे. अस्पृश्यांत सहभोजन व्हावे, सहविवाह व्हावा याचा पुरस्कार मी केला आहे. आरि सहविवाह जरी जारी झाला नसला, तरी चांभार लोक सहभोजनाला तयार नाहीत, पण महारमांगात, महारमंग्यांत सरसहा सहभोजन सुरू आहे. हा माझ्या शिकवणुकीचा परिणाम आहे, असे मी निर्भयपणे म्हणू शकतो. माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभांतून महारांपुरते ठराव कधीच पास झालेले नाहीत, मी महार जातीचे भांडण भांडलो नाही, आणि या भांडणांतून जो लाभ झाला त्यांतला मोठा भाग महारेतर जातींनी घेतला हेही सिद्ध करून देता येईल. मी जी बोर्डिगे काढली त्यांत जातीभेद कधीच ठेवला नाही, इतर महारांनी जी काढली त्यांत त्यांनीही जातीभेद ठेवलेला माझ्या कानावर आलेला नाही.
स्वतंत्र मजूर पक्ष हा महारांचा पक्ष आहे, असे म्हणण्यात येते. परंतु ते खोटे आहे. स्वतंत्र मजूर पक्षात महार-महारेतर असा भेद नाही. स्वंतत्र मजूर पक्ष जात पहात नाही, गूण पाहतो. गुणाला उतरला तर त्याला त्याच्या लांटकीची जागा स्वतंत्र मजूर पक्षात मिळू शकते. राजकारण है काही पंक्तीभोजन नव्हे. मांग कोणी नाही म्हणून मांग घ्या, भंगी कोणी नाही म्हणून भंगी घ्या, असा नियम स्वतंत्र मजूर पक्ष मानीत नाही. कोणताही राजकीय पक्ष मानू शकणार नाही. नुसत्या शिक्षणाला राजकारणात काही महत्त्व नाही. "मी ग्रॅज्युएट आहे, मल कौन्सिलात घ्या”, हा नियम स्वतंत्र मजूर पक्षाला कबूल नाही, कोणाही राजकीय पक्षाला तो नियम मान्य होऊ शकणार नाही. राजकारणात शिक्षण पाहिजे पण शिक्षणांपैकी शीलाची जास्त जरूरी आहे. स्वतंत्र मजूर पक्ष जात, शिक्षण, शील या तिन्ही गोष्टी पाहून कौन्सिलचे उमेदवार ठरवतो. अस्पृश्यांचे भांडण भांडण्याकरिता स्वतंत्र मजूर पक्ष उभा केला [आहे, ] [त्यात ] [एखाद्या ] [मांगाला ] [जागा ] मिळाली नसेल. तशी अस्पृश्यांतील नाशिक जिल्ह्यातील एक सधन व कार्यकर्त्या अमृतराव रणखांब्यासारख्या माणसाला व सातारा जिल्ह्यातील [एका ] सधन गृहस्थाच्या मुलांस स्वतंत्र मजूर पक्षात जागा मिळाली [नाही. ] यावरून स्वतंत्र मजूर पक्ष मांगांच्या व चांमारांच्या विरूद्ध [आहे, ] [असे ] [म्हणण्यात ] [काही ] [अर्थ ] नाही. स्वतंत्र मजूर पक्ष नालायकांच्या विरूद्ध आहे, मग ते कोणत्याही [जातीचे ]