एका मातंग गृहस्थाच्या पत्रास उत्तर - Page 389

एका सातंग गृहस्थाच्या पत्रास. उत्तर ३४७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाठविलेले

दे, ना. कांबळे (मातंग) यांचे पत्र

35

“पाथ्री : ३०-५-१९४१

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस देवीदास बुवा पाथ्रीकर याचा सादर प्रणाम वि. वि. लिहिण्यास कारण की, आपणांस पत्र पाठवून पूर्ण खुलासा करून घेण्याचा, माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून विचार आहे. याबद्दलचा सोक्षमोक्ष तो काय आताच करून घ्यावा व मनातील खुडखुडी काढून टाकावी असे वाटले म्हणून आपणास हे पत्र पाठवीत आहे. हे पूर्ण वाचून विचार करून आपले खरें उत्तर देणे. जर पत्राचे उत्तर आले नाही तर आपण विलयतेस जाताना १७ पानांचे पत्र गांधीस पाठविले होते, पण गांधीने अधिकाराच्या मदाने, अहंकाराने किंवा तुच्छतेने आपणास निष्काळजीपणाने उत्तर दिले नाही, त्यावेळी

आपणास जसे वाईट वाटले व गांधीबद्दल आपणास जसा तिरस्कार उत्पन्न झाला

त्यापेक्षाही हजारपट तिरस्कार मला आपणाबद्दल उत्पन्न होईल.

मी निजाम इलाख्यातील मराठवाडा भागातील मातंग समाजातील शिकलेला पहिला विद्यार्थी असून मातंग समाजातील सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे. मी आपणास सामान्य विद्यार्थी या नात्याने पत्र पाठवीत नसून निजाम स्टेटच्या मातंग समाजाचा भावी पुढारी म्हणून पत्र पाठवित आहे. म्हणून आपण उत्तर देण्यास अनमान करू नये

मातंग समाज व महार समाज यांमध्ये देव-दानवासारखे हाडवैर आहे व आपसात वैर, तिरस्कार, द्वेष, मत्सर आणि वाईट.भावना आहेत त्याची कारणे--

(१) महार समाज मातंग समाजास तुच्छ व हलका समजतो. (२) मातंग समाज डुकरास पवित्र मानतो व ते जनावर शूर व मर्द असल्यामुळे त्याची (रानडुक्कर) शिकार करतो, पण महार समाज मुसलमानापेक्षाहि डुकरास अपवित्र समजतो. ह्या व इतर क्षुल्लक कारणावरून आपसात विनाकारण झगडे होतात. (३) मातंग समाजात मराठयाप्रमाणे सर्व सण व लग्नसमारंभ व मिरवणुकी काढण्याचा हिंदु धर्मशास्त्रदृष्ट्या अधिकार आहे, म्हणून ज्यावेळी मातंग लोकांचा नवरदेव गांवामधून घोड्यावरून मारुतीला परण्यास जातो त्यावेळी महार लोक वेशीमध्ये अडवतात व पंचारतीमध्ये थुंकतांत. यामुळे भयंकर मारामारी होऊन डोकी फुटतात व वैरभाव वाढतो. (४) कोणतीहि सुधारणेची गोष्ट मांग लोक करीत असता महार लोक ती करू देत नाहीत, व ती हाणून पाडण्याचा कसून