डॉ. बावासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे 3४८
वाकडे (५) लोकसंख्येच्या विरोध करतात म्हणून मांग व महार यांचे आहे.
प्रत्येकी गांवी महारांची जास्त मानाने महार लोकांची संख्या जास्त असल्यामुळे
मनाप्रमाणे न वागले आबादी आहे द मांगांची कमी आहे. जर लोक महारांच्या
तर महार लोक विनाकारण त्रास देतात व त्यांना वाटते की, ज्याप्रमाणे हिंदु लोकांची गुलामगिरी अस्पृश्य समाज करतो, त्याप्रमाणे मातंग समाजाने महार समाजाची गुलामगिरी करावी. (६) अस्पृश्य समाजात शिकलेले व पुढे गेलेले महार लोक आहेत, हे स्वार्थी व आपमतलबी असून इतर समाजातील लोकांस पुढे जाण्यास द सुधारण्यास वाव देत नाहीत. याची साक्ष जितक्या बोडिंग्स आहेत त्यात महार विद्यार्थ्याचाच भरणा जास्त आहे. जितके एम्. एल. ए. आहेत ह्यात महार मेंडर'चाच भरणा जास्त आहे. फक्त नावाकरिता काही ठिकाणी कळसूत्री बाहुल्यांसारखे मांग मेंबर निवडले असून ते बिनबुडाच्या भांड्याप्रमाणे आहेत. (७) आएणाबद्दल मातंग समाजात असा गैरसमज उत्पन्न झाला आहे की, आपण स्वतः महार समाजाच्या कल्याणाची जास्त काळजी घेता. दुसऱ्या समाजाची तितकी घेत नाही. म्हणून मातंग परिषद मध्यप्रांताने आंबेडकर फक्त महार समाज'चे पुढारी आहेत, मातंग समाजाचे नाहीत असा ठराव पास केला. (८) आपली दृत्ति जो प्रथम येऊन (शिकायत) करील त्याचीच बाजू न्यायाची आहे अशी मानणारी असल्यामुळे प्रथम महार समाजातील लोक आपल्याकडे येतात व
आपण त्यांची बाजू उचलून धरता म्हणून इतर समाजास पक्षपाती आहात असे
भासते व आपण महार समाजाचे हितचिंतक आहात असे वाटते.
जर आपणास अस्पृश्य समाजाचे खरे कल्याण करावयाचे असेल व महार व मातंग समाज यांची एकी करून सांगड घालून नवा मार्ग आखावयाचा असेल तर खालील शर्तीवर विशेष लक्ष घालणे व त्याप्रमाणे मनःपूर्वक लक्ष देऊन कार्य करणे, कारण महार समाज आपणास देवतुल्य मानतो व आपला शब्द प्राणाचे पण लावून
पूर्ण करण्याचा कसून प्रयत्न करतो.
माझ्या मताने ज्याप्रमाणे नॉर्मन (Norman) आणि सँक्सन (Saxon) यांच्या मिश्रणाने रिचर्ड लायन हार्ट यांच्या कारकीर्दीत या परस्परविरूद्ध जातीच्या संमेलनाने अर्वाचीन धैर्यशाली, वीर्यशाली व सुधारलेली इंग्रज जात निर्माण झाली त्याप्रमाणे करावी की, जिचे नाव ऐकताच सर्व जातीवर व समाजावर दरारा बसावा जिच धर्म व कर्म इतराहून भिन्न असावा, यासाठी आपण खालील गोष्टीकडे लक्ष
ene,
[ (०) हा मुद्दा गाळलेला दिसतो.] (२) मातंग समाजास महार समाजाने बरोबरीच्या व समानतेच्या नात्याने व बंधुभावाने वागवावे. (३) मातंग समाजातील होतकरू मनुष्याला पुढे येण्यास वाव द्यावा. (४) मातंग लोकांचा नवरदेव वेशीमध्ये अडवू नये व समारंभ व मिरवणुकी यामध्ये अडथळेच आणू नयेत.