एका मातंग गृहस्थाच्या पत्रास उत्तर - Page 391

एका मातंग गुहरथाच्या पत्रास उत्तर _ ३४९

(५) महार समाजाने मातंग लोकाकडून कोणत्याही प्रकारचे वतनदारी संबंधीचे हक्क घेऊ नयेत (जसे महार लोक हिंदु समाजाकडून घेत असत). (६) आपण महार समाजाच्या सुधारणेची जशी काळजी घेतात तशीच किंबुहना त्यापेक्षाही जास्त कळकळ मातंग समाजाबद्दल घेणे. कारण, आपण महार समाजामध्ये जन्मला असल्यामुळे आपणावर जातीयतेचा आरोप येतो, व म्हणूनच आपण महाराचेच हितचिंतक आहात अशी कोल्हेकुई होते. (७) डुकराबद्दल महारांच्या मनात तिरस्कार व इतर क्षुल्लक कारणावरून झगडे, द्वेषभाव निर्माण करणारी जी साधने आहेत ती मिटविण्याची व आपापसात प्रेम व बंधुभाव निर्माण करणाऱ्या साधनांची योजना करणे. (८) श्रद्धेने व अज्ञानाने महार समाज आपणास ईश्वरी अवतार मानून आपल्या फोटोचे पूजन करतात व आपणाशिवाय दुसरा. कोणी होणारच नाही असा बुद्धीमंतास वाव न देणारा समज करून घेतात, तो मला पसंत नाही व हे अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण मी मातंग समाजास करू देणार नाही.

जर या सर्व अटी मान्य असतील व आपणास अखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे पुढारीपण करावयाचे असेल तर मी आपला शिष्य होण्यास तयार आहे. आपल्या व्याख्यानावरून मी गेल्यावर कसे होईल ही काळजी वाटत आहे ती आपल्या कृपेने मी दूर करीन व आपल्या मनाप्रमाणे कार्य करून दाखवीन म्हणून उत्तर पूर्ण विचार करून आपल्या स्वाक्षराने देणे. मी १५ दिवस वाट पाहीन. उत्तर न आले तर मी असे समजेन की, आपला मार्ग निराळा व माझा मार्ग निराळा. म्हणून अवमान न करता आपले मत, विचार सविस्तर पत्र पाठवून खुलासा करणे कारण अजून एक महिन्यानंतर हैद्राबाद दलितवर्ग परिषद हैद्राबादी आंबेडकर बी. एस. व्यंकटराव यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे. व मी मातंग समाजाचा प्रतिनिधी या नात्याने जाणार आहे. म्हणून लवकरच महार व मांग यांच्या भावी जीवनाबद्दल खुलासा करणे किंवा एकदम वेगवेगळे गट करणे, पण असे अर्धवट इकडे ना तिकडे, कच्चे ना पक्के ठेवू नये, कळावे.

आपला कृपाभिलाषी,

देवीदासराव नामदेवराव कांबळे

ता. पाश्री, मैहलामाळी वाडा, जि. परभणी (निजामस्टेट)

नोट : पूर्ण पत्र वाचणे व पूर्ण विचार करून अनमान न करता उत्तर देणे. मी आतुरतेने वाट पाहात आहे. उत्तर संक्षिप्त देऊ नका. सविस्तर देणे. नाहीतर तुमचा आमचा मार्ग भिन्न.”

eee

जनता, दिनांक १४ जून १९४१

उद्घृत.. खैरमोडे, खंड ९ वा, पृ. ९१-९९.

वाय ६४१ - २५