हे सत्य की कावा ? ३५१
लोकमान्याच्या अंकाच्या अग्रलेखातील उतारे आहेत. वरील उद्गार वाचून लोकमान्याच्या मतप्रणालिकेत केवढे मतपरिवर्तन झाले आहे, हे कोणासही कळून येईल. आम्हास आनंद वाटतो की जे मत आम्ही आज कित्येक दिवस प्रतिपादन करीत आलो आहोत तेच मत खरे ठरून शेवटी लोकमान्यासारख्या सर्वस्वी काँग्रेसला वाहिलेल्या वर्तमानपत्राला देखील त्याच्या सत्यतेबद्दल ग्वाही द्यावी लागली. आम्हाला जो खेद वाटतो तो एवढ्याकरता की "लोकमान्या'चे डोळे उघडण्याकरिता इतका कालावधी लागला. आज लोकमान्याने जे मत प्रदर्शित केले आहे तेच मत याच्या पूर्वी जर प्रसिद्ध करण्यात आले असते, आणि ते मत जनतेत प्रसृत करण्यात आले असते तर आज जी स्थिती जनतेची झाली आहे ती झाली नसती. ही स्थिती किती वाईट झाली आहे, हे नुकत्याच 'सोशल वेल्फेअर' या मासिकामध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे चिटणीस आचार्य कृपलानी यांनी लिहिलेल्या लेखावरून कोणालाही कळून येण्यासारखे आहे. 'हल्लीची कोंडी फोडण्यांस मार्ग काय आहे' असा आचार्य कृपलानी यांनी आपल्या लेखाला मथळा दिला आहे. आणि 'परचक्र आल्यास हिन्दुस्थानचे संरक्षण कसे करावयाचे! या विषयीची त्यांनी चर्चा केली आहे. काही काँग्रेसवादी लोकांना इंग्लंडच्या बाजूची पिच्छेहाट झाल्याची बातमी आली की हर्ष होतो. परंतु आचार्य कूपलानी यांच्या मते इंग्लंडच्या बाजूच्या पिच्छेहाटीची बातमी आली की लोक हताश होतात. आमच्या मते, हे सत्य राजश्री कृपलानी यांनी बाहेर आणले हे चांगले झाले. हताश होण्याची कारणे व त्यावर उपाययोजना कोणती याचा विचार करताना त्यांनी असे म्हटले आहे की या निराशेची कारणे तीन आहेत.
(१) परचक्रास तोंड देण्यास हिन्दुस्थानची पुरेशी. लष्करी तयारी नाही. (२) परचक्रास प्रतिकार करता यावा अशी देशाची तयारी करण्यासाठी सरकार काहीही करीत नाही. (३) हिंदी जनतेवर सरकारचा विशवास नसल्यामुळे सरकार जनतेचे सहाय्य घेत नाही... सरकारी युद्ध प्रयत्नाचे परीक्षण करून ही तीन कारणे कशी खरी आहेत ते कृपलानी यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. सरकारच्या बाजूने अशी निराशा झाल्यामुळे लोक काँग्रेसकडे पाहतात पण कृपलानी दीनवाणीने म्हणतात : “काँग्रेस तरी काय करणार ? लष्करी संघटना काही खाजगी संस्थामार्फत करता येत नाही. आणि सरकार तर आमचे सहकार्य लाथाडते. तेव्हा करणार काय ? रडत बसू नये. अजूनही एखादा चमत्कार घडून अनुकूल काल येईल त्याची वाट पाहात तयारीने [बसावे, ] [निदान ] [इश्वर ] [आणि ] सृष्टि याची प्रार्थना करीत तयार रहावे
या लेखात रा. कृपलानी यांनी जो मार्ग सुचविला आहे तो पाहिला म्हणजे काँग्रेसच्या शक्तीचा किती क्षय झाला आहे, हे दिसून येण्यासारखे आहे.